सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सध्या खूपच चर्चेमध्ये आहे. बिहार पोलिसांपासून ते सुशांतच्या कुटुंबापर्यंत रिया चारही बाजूने वेढली गेली आहे. रिया आणि तिच्या कुटुंबियांवर आरोप लागला आहे कि रिया आणि तिच्या कुटुंबाने सुशांतचा वापर केला. त्याच्या पैशांना हडपण्यासाठी प्रेमाचा खोटा खेळ खेळला गेला. जेव्हा सुशांत खूपच जास्त अस्वस्थ झाला तेव्हा ती त्याला एकटा सोडून निघून गेली. सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती गेल्या एक वर्षापासून लिवइनमध्ये राहत होते. या जानेवारीमध्ये रियाने सुशांत आणि आपले फोटो शेयर करत नात्याला ऑफीशियल केले होते.

कोण आहे रिया चक्रवर्ती?

सुशांत प्रकरणाची चौकशी आता सीबीआई करत आहे, तपासाच्या घेऱ्यामध्ये रिया चक्रवर्तीचा नंबर सर्वात पहिला आहे. पण रिया चक्रवर्ती कोण आहे, कधीपासून इंडस्ट्रीमध्ये आहे, कसे करियर सुरु झाले जाणून घेऊया. रिया चक्रवर्तीचे स्कूलिंग अंबाला कॅंटमधील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये झाले. बंगाली वंशाच्या रियाचे वडील आर्मीमध्ये डॉक्टर आहेत आणि आई गृहिणी आहे. रियाच्या करियरची सुरुवात एमटीव्हीच्या रियालिटी शो टीन दिवापासून झाली होती. या शोनंतर रियाने वीजे बनून कॉलेज बीट आणि एमटीवी गॉन इन ६० सेकंड्स सारखे शो देखील होस्ट केले होते.

अभिनेत्री बनण्यासाठी रिया मुंबईला आली

रिया होस्टिंगबरोबरच इंजीनियरिंगचे शिक्षण देखील घेत होती. पण तिला अभिनेत्री बनायचे होते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासठी रिया मुंबईला आली. तिने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात २०१२ मध्ये तुनेगा तुनेगा या तेलगु चित्रपटामधून केली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. २०१३ मध्ये रियाने मेरे डॅड की मारुति चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. पण हा चित्रपट देखील फ्लॉप झाला.

एकामागून एक फ्लॉप झाले चित्रपट

रियाने यानंतर सोनाली केबल चित्रपटामध्ये काम केले पण तोही चित्रपट फ्लॉप राहिला. यानंतर तिला पुढच्या ३ वर्षामध्ये कोणताही चित्रपट मिळाला नाही. रियाने काही जाहिरातींमध्ये देखील काम केले. यानंतर काही इतर चित्रपट केले पण सर्व फ्लॉप राहिले. त्यानंतर आला तिचा जलेबी चित्रपट या चित्रपटानंतर ती मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली नाही. प्रत्येक चित्रपटासाठी तिला जवळ जवळ २५ लाख रुपये मिळत होते, एखाद्या ब्रँड अॅनन्डॉर्समेंटसाठी तिला फक्त ३ ते ५ लाख रुपये इतकी फीस दिली जात होती. तिचे वार्षिक उत्पन्न १० ते १५ लाख रुपये सांगितले जाते.

करोडोंची प्रॉपर्टी कशी बनवली

पण आता प्रश्न हा येतो कि फ्लॉपवर फ्लॉप चित्रपट देऊनहि तिच्याजवळ करोडोंची प्रॉपर्टी आहे. रियाने हि प्रॉपर्टी कशी मिळवली, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी ईडी करत आहे. वास्तविक रियावर सुशांत सिंह राजपूतचे १५ करोड रुपये हडप केल्याचा देखील आरोप आहे. याशिवाय ती त्याचे क्रेडीट कार्ड देखील वापरत होती, सुशांतचे फाइनेंशियल मॅटर देखील रिया आणि तिचे कुटुंब पाहत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने