आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिने ५० आणि ६० च्या दशकामध्ये आपल्या सौंदर्याने प्रत्येक अभिनेत्रीला मागे टाकले होते. बालकलाकार म्हणून आपल्या करियरची सुरुवात करणारी हि अभिनेत्री आपल्या आयुष्याच्या अंतिम क्षणी खूपच एकटी पडली होती. या अभिनेत्रीच्या सौंदर्याचा प्रत्येकजण चाहता होता. पण शेवटच्या क्षणी तिचे कुटुंबहि तिच्यासोबत नव्हते आणि फिल्मी जगताने देखील तिच्याकडे लक्ष दिले नव्हते. या अभिनेत्रीचे नाव आहे नलिनी जयवंत. आज आपण नलिनी जयवंत बद्दल जाणून घेणार आहोत.

नलिनी जयवंतची न ऐकलेली कहाणी

कधी काळी फिल्मी जगतावर राज्य करणारी अभिनेत्री नलिनी जयवंतने २०१० मध्ये या जगाचा निरोप घेतला. आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये नलिनीला अज्ञात आयुष्य जगण्यास भाग पडावे लागले होते. चित्रपटांपासून दूर झाल्यानंतर कोणीही तिच्याकडे लक्ष केले नाही, स्वतः तिच्या कुटुंबाने देखील तिची साथ सोडली होती. शेवटच्या दिवसांमध्ये नलिनी एकटी राहत होती. तिच्या मृत्यूनंतर तिचा मृत-देह ३ दिवस घरामध्ये पडून होता. तिचा शेवट खूपच दुखद होता.

अज्ञात व्यक्तीने उचलला होता मृतदेह

डिसेंबर २०१० मध्ये जेव्हा नलिनीचा मृत्यू झाला तेव्हा हि बातमी आली होती कि तिच्या मृतदेहाला एक अज्ञात व्यक्ती गाडीमध्ये घालून घेऊन गेला होता. पोलिसांना देखील याची तक्रार केली गेली नाही. नलिनी जयवंतच्या मृत्यूचे कारण अद्यापही एक रहस्यच आहे. तिचे पहिले लग्न ४० च्या दशकामध्ये डायरेक्टर वीरेंद्र देसाई सोबत झाले होते. नंतर तिने दुसरे लग्न अभिनेता प्रभु दयाल सोबत केले.

वयाच्या १४ व्या वर्षी सुरुवात

नलिनी जयवंतने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी सुरु केली होती. १९४१ मध्ये राधिका चित्रपटामध्ये ती बालकलाकार म्हणून पाहायला मिळाली होती. नंतर तिने ५० च्या दशकामध्ये समाधी आणि संग्राम सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आणि टॉप अभिनेत्रींमध्ये आपले स्थान पक्के केले. अशोक कुमारसोबत तिची जोडी खूपच पसंत केली जात होती. दोघांनी काफिला, जलपरी, लकीरे, मिस्टर एक्स आणि तुफान में प्यार कहां सारखे चित्रपट केले. नलिनी खूपच सुंदर होती १९५२ फिल्मफेअर मॅगझीनच्या एका ब्यूटी पोलमध्ये नलिनी पहिल्या नंबरवर होती.

अमिताभच्या आईच्या भूमिकेत शेवटची दिसली होती

६० चे दशक येत येता नलिनीला काम मिळणे बंद झाले, ती चित्रपटांपासून दूर गेली आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये व्यस्त झाली. १९८३ मध्ये रिलीज झालेल्या नास्तिक चित्रपटामध्ये तिने अमिताभ बच्चनच्या आईची भूमिका साकारली होती. चित्रपटांमध्ये खूपच चांगले आयुष्य जगणारी नलिनी आपल्या शेवटच्या काळामध्ये खूपच एकटी पडली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने