सुशांत सिंह राजपूतने ज्या दिवशी आ*त्म*ह*त्या केली होती, त्या दिवशी एक महिला त्याच्या बिल्डींगमध्ये दिसली होती. हि मुलगी कोण होती, याबद्दल कोणतीच माहिती मिळत नव्हती. बिल्डींगच्या गार्डने सांगितले कि त्या दिवशी हि महिला आली होती, तोंडावर मास्क होता आणि त्याला वाटले कि सुशांतच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी असेल यामुळे तिला जाऊ दिले. या महिलेबद्दल तपास लावला जात होता. आता माहिती मिळत आहे कि या महिलेबद्दल तपास लागला आहे.

रियाच्या भावाची आहे जवळची दोस्त

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार हि महिला रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीची दोस्त आहे. महिलेचे नाव जमिला आहे. वास्तविक या महिलेचा खुलासा सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनंतर झाला. ज्यामध्ये एक संदिग्ध महिला त्याच्या बिल्डींगमध्ये जाताना दिली होती, ठीक त्या दिवशी ज्यादिवशी त्याने आ*त्म*ह*त्या केली होती. हि महिला रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकची दोस्त आहे.

सुशांतला पाहण्यासाठी आली होती जमिला

मिळालेल्या माहितीनुसार जमिला आपली दुसरी दोस्त प्रियांका खेमानी आणि महेश शेट्टीसोबत सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याला पाहण्यासाठी आली होती. पण तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांच्या टीमने त्यांना सुशांतच्या घरामध्ये जाऊ दिले नाही आणि ती घराच्या स्टाफला भेटल्यानंतर तेथून निघून गेली होती. सोशल मिडियावर जमिलाचा आणखी एक फोटो समोर आला आहे जिथे जमिला आणि शौविक सुशांत आणि रिया समवेत दुसऱ्या लोकांसोबत एकाच फोटोमध्ये आहेत.

गुंतागुंतीचे होत आहे प्रकरण

सुशांत सिंह राजपूत प्रकरण आणखीनच गुंतागुंतीचे होत आहे. रिया आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये होते, सुशांतच्या कुटुंबाने रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावले आहेत. प्रकरणामध्ये रियाच्या विरुद्ध तपास चालू आहे. सुशांतच्या मनी मॅटरबद्दल देखील रिया वेढली गेली आहे, प्रवर्तन निदेशालय तिची चौकशी करत आहे. रियावर सुशांतचे पैसे हडपण्यापासून त्याला आ*त्म*ह*त्येसाठी प्रवृत्त करण्यापर्यंत आरोप आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने