भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ज्याला कॅप्टन कूल या नावाने ओळखले जाते असा महेंद्रसिंग धोनीने शनिवारी स्वातंत्र्यदिनी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर काही वेळातच सुरेश रैनाने देखील क्रिकेट जगताचा निरोप घेतला. धोनीच्या निवृत्तीच्या बातमीनंतर तो खूपच चर्चेमध्ये आहे.

सोशल मिडियावर धोनी संबंधित अनेक प्रकारचे व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत, तर आता तो आणखी एका गोष्टीमध्ये जास्त चर्चेमध्ये आला आहे, कॅप्टन कूल म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीने एका चित्रपटामध्ये अॅक्टिंग केली होती. २०१० मध्ये हि बातमी आली होती कि धोनीने या चित्रपटासाठी शुटींग केली होती.

परंतु काही कारणामुळे हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. महेंद्र सिंह धोनीने डेविड धवनचा हुक या क्रुक या चित्रपटामध्ये अॅक्टिंग केली होती, जो एक क्रिकेट बेस्ड चित्रपट होता. या चित्रपटाची घोषणा २००६ मध्ये केली गेली होती आणि डेविड धवनचा हा चित्रपट फक्त एक स्वप्नच राहिला.

बातमीनुसार चित्रपटाच्या मुख्य भूमिकेमध्ये जॉन अब्राहम आणि धोनीशिवाय श्रेयस तळपदे, जेनेलिया डिसूझा, उदय चोप्रा आणि केके मेनन हे देखील कलाकार होते. असे म्हंटले जाते कि हा चित्रपट विक्ट्री या हॉलिवुड चित्रपटाशी इंस्पायर्ड होता. जॉन अब्राहम सोबत धोनीचा हा चित्रपट यामुळे देखील खास होता कारण दोघे रियल लाईफमध्ये देखील एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि चित्रपटामध्ये दोघांनी बॉन्डिंग पाहणे खूपच खास असते पण असे झाले नाही.

त्यांचा हा चित्रपट तर बनू शकला नाही पण त्याच्या लाईफवर आलेला एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपट जो २०१६ मध्ये रिलीज झाला होता तो खूपच सुपरहिट झाला होता. ज्यामध्ये धोनीची भूमिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने साकारली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने