अभिनेत्री जेनेलिया डिसूजाने आपला पहिला चित्रपट तुझे मेरी कसम चित्रपटामधून लोकांच्या मनामध्ये खास जागा बनवली होती. जेनेलियाचा जन्म ५ ऑगस्ट १९८७ रोजी मुंबईमध्ये झाला होता. तिने अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न केले आहे. लग्नानंतर जेनेलिया चित्रपटांपासून दूर गेली. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

२००३ मध्ये अभिनेत्री जेनेलिया डिसुजाला पहिल्यांदा लोकांनी तुझे मेरी कसम चित्रपटामध्ये पाहिले होते. या चित्रपटामध्ये अभिनेता रितेश देशमुख देखील मुख्य भूमिकेमध्ये होता. यानंतर जेनेलियाने जाने तू या जाने ना, चांस पे डांस, फोर्स आणि तेरे नाल लव हो गया सारख्या अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले. हिंदी चित्रपटांशिवाय जेनेलियाने तमिळ, तेलगु, मल्याळम, कन्नड आणि मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

रितेश आणि जेनेलिया यांची भेट पहिल्यांदा हैद्राबाद एयरपोर्टवर झाली होती. त्यावेळी रितेशचे वडील विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जेनेलिया जेव्हा पाहिलांदा रितेशला भेटली होती तेव्हा ती त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. तिला वाटत होते कि एका मुख्यमंत्र्याचा मुलगा असल्यामुळे रितेशचा व्यवहार दबंग प्रकारचा असेल. याचा खुलासा स्वतः रितेशने एका मुलाखतीमध्ये केला होता.

चित्रपटाच्या सेटवर जेव्हा जेनेलिया आणि रितेश भेटले तेव्हा त्यांच्यामध्ये मैत्री झाली. हैद्राबादमध्ये शुटींग संपल्यानंतर जेव्हा रितेश घरी परत आला तेव्हा जेनेलियाला मिस करू लागला. येथूनच दोघांमधील लव्ह स्टोरी सुरु झाली होती. जेनेलियाने यानंतर रितेशसोबत मस्ती चित्रपटामध्ये काम केले. दोघांचे नाते तसे तर पहिल्याच चित्रपटापासून सुरु झाले होते पण त्यांनी मिडियाला याबद्दल कळू दिले नाही.

पहिल्या चित्रपटानंतर रितेश आणि जेनेलिया एंगेजमेंट करणार होते अशी देखील चर्चा होती पण रितेशचे वडील विलासराव देशमुख यासाठी तयार नव्हते. जेनेलियाने रितेशला एक चांगला मित्र असल्याचे सांगत अफेयरच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता. २०१२ मध्ये जेव्हा दोघे तेरे नाल लव हो गया चित्रपट करत होते त्यावेळी पुन्हा रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाच्या बातम्या येऊ लागला. शेवटी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी दोघेही विवाह बंधनामध्ये अडकले. दोघांना दोन मुले रियान आणि राहील आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने