सुशांत सिंह राजपूत आ त्म ह त्या प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीची प्रवर्तन निदेशालय (ईडी)ने दुसऱ्या दिवशी देखील कसून चौकशी केली आहे. प्रवर्तन निदेशालय (ईडी)ने सोमवारी रियाची १० तास चौकशी केली आहे.

प्रवर्तन निदेशालय (ईडी)ने रिया सहित तिचा भाऊ. वडील, सुशांतची एक्स बिजनेस मॅनेजर श्रुति मोदी, सिद्धार्थ पिठानीची देखील या दरम्यान चौकशी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रियाने प्रवर्तन निदेशालय (ईडी) समोर आपल्या खर्चांचा पुरावा देण्यासाठी डॉक्यूमेंट्स ठेवले, पण सूत्रांनुसार तिच्या कोणत्याही पुराव्यावर ईडी समाधानी नाही. सुशांत प्रकरणामध्ये ईडीने रिया चक्रवर्ती तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि तिच्या वडिलांची चौकशी केली. सकाळी ११ वाजता सुरु झालेली हि चौकशी जवळ जवळ १० तास चालू होती.

ईडी याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे कि इतक्या कमी कमाईमध्ये रियाने ७६ लाख रुपयेचे शेयर्स कसे खरेदी केले. याचबरोबर सुशांतच्या अकाऊंटमधून १५ करोडच्या हेराफेरीचा आरोप देखील रिया आणि तिच्या कुटुंबावर होता, पण याबद्दल काही ठोस पुरावे मिळाले नाहीत.

सुशांत सिंह राजपूत आ त्म ह त्या प्रकरणामध्ये सीबीआईने देखील तपास सुरु केला आहे. सुशांतचे वडील केके सिंहची सोमवारी सीबीआईने चौकशी केली. या चौकशीमध्ये केके सिंहने आपला जबाब नोंदवला. आपल्या जबाबामध्ये केके सिंह म्हणाले कि त्यांचा मुलगा सुशांत कोणत्या परिस्थितीमध्ये होता आणि त्याचा मृत्यू होण्याची वेळ कशी आली याचा तपास केला गेला पाहिजे.

सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा पोहोचली रिया

रिया चक्रवर्तीने सुशांत केसबद्दल पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रियाने सुप्रीम कोर्टामध्ये एक नवीन याचिका दाखल केली आहे. तिचा आरोप आहे कि सुशांत केसमध्ये मिडिया ट्रायल होत आहे. रियाने हे देखील आरोप लावले कि सुशांतच्या मृत्यूसाठी तिला दोषी ठरवले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने