गुजरातमध्ये जन्मलेले तरुण आईपीएस सफीन हसनने जामनगर मध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक पदाचा पदभार हाती घेतला आहे, ट्रेनिंगनंतर त्यांना जामनगरमध्ये पहिली पोस्टिंग मिळाली आहे, सर्वात तरुण आईपीएसचे लहानपण खूपच संघर्षपूर्ण राहिले आहे. त्यांना मुलभूत गोष्टींसाठी खूपच संघर्ष करावा लागला आहे, तथापि आपल्या मेहनत आणि जिद्दीमुळे त्यांनी देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या यूपीएससीमध्ये ५७० वी रँक मिळवून देशातील युवकांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

२०१६ मध्ये सुरु केली तयारी

आपल्या तयारीबद्दल सांगताना हसन म्हणाले कि जून २०१६ मध्ये यूपीएससी आणि जीपीएससीची मी तयारी सुरु केली होती, गुजरात पीएससीमध्ये देखील सफलता मिळवली, अनेक असे प्रसंग आले जेव्हा मी आतून खचलो होतो, पण मी माझी जिद्द सोडली नाही. परीक्षेपूर्वी माझा अपघात झाला होता, तथापि माझे नशीब इतके चांगले होते कि ज्या हाताने लिहित होती, तो चांगला होता, मी पेन किलर खाऊन परीक्षा दिली, आणि परीक्षेनंतर मी हॉस्पिटलमध्ये बराच काळ भरती राहिलो.

आईवडिलांनी केला अनेक अडचणीचा सामना

हसन यांनी आपल्या कौटुंबिक स्थितिबदल सांगताना म्हंटले कि माझ्या आईवडिलांचे इतके उत्पन्न नव्हते कि ते आम्हाला चांगल्या सुख सुविधा देऊ शकले असते, माझी आई नसीम बानो रेस्टॉरंट्स आणि लग्न समारंभामध्ये चपात्या बनवायचे काम करत होती, वडील मुस्तफा आधी एका हिऱ्यांच्या युनिटमध्ये मजुरी करायचे, नंतर त्यांची नोकरी गेली, तेव्हा त्यांनी इलेक्ट्रिशियनचे काम सुरु केले, नंतर थंडीमध्ये अंडी आणि चहा टपरी लावत असत, कसेबसे आमचे घर चालत असे, अनेक वेळा तर आम्हाला उपाशी पोटी झोपावे लागत होते.

तेव्हा ठरवले कि आईपीएस बनायचे

आईपीएस बनण्याचा विचार कसा आला, याचे उत्तर देताना हसन यांनी सांगितले कि मी लहान होतो, मावशीसोबत शाळेमध्ये गेलो होतो, जिथे समारंभ चालू होता, तिथे एका व्यक्तीचा खूप सन्मान केला गेला, तेव्हा मी मावशीला विचारले कि हे कोण आहे, तेव्हा मावशीने सांगितले ते आईपीएस आहेत, जिल्ह्याचे मालक आहेत, तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला कि आईपीएस बनायचे.

काही चांगल्या लोकांनी मदत केली

हसन यांनी सांगितले कि माझे प्राथमिक शिक्षण उत्तर गुजरातच्या बनासकांठाच्या पालनपुर तहसील येथील छोटे गाव कणोदर मध्ये झाले होते, प्राथमिक शिक्षणानंतर इंजीनियरिंगच्या शिक्षणासाठी मी सुरतला आलो, जिथे एनआईटीमध्ये मला प्रवेश मिळाला, माझ्या प्राचार्यांनी माझी ८० हजार रुपयांची फीस माफ केली होती. याशिवाय जेव्हा यूपीएससीच्या तयारीसाठी मी दिल्लीला आलो, तेव्हा गुजरातच्या पोलरा कुटुंबाने २ वर्षांपर्यंत माझा सर्व खर्च उचलला, ते लोक माझ्या कोचिंगची फीस देत होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने