साउथ चित्रपटांचे सुपरस्टार चिरंजीवी ६५ वर्षांचे झाले आहेत. २२ ऑगस्ट १९५५ रोजी आंध्रप्रदेशच्या मोगालथुर मध्ये जन्मलेल्या चिरंजीवी यांचे खरे नाव कोनीडेला शिव शंकर वरा प्रसाद आहे. आईच्या सांगण्यावरून त्यांनी चित्रपटांमध्ये आपले नाव चिरंजीवी ठेवले, ज्याचा अर्थ आहे नेहमी जीवनात राहणारा. चिरंजीवी यांच्याबद्दल तर लोकांना बरेच काही माहिती आहे पण त्यांच्या फॅमिली मेंबर्सबद्दल खूपच कमी लोकांना माहिती आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपण त्यांच्या फॅमिलीबद्दल जाणून घेणार आहोत.

चिरंजीवी यांनी १९८० मध्ये सुरेखासोबत लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत. मुलाचे नाव रामचरण तेजा आहे, जो साउथ चित्रपटांमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. २७ मार्च १९८५ रोजी हैद्राबाद मध्ये जन्मलेल्या रामचरणने आपल्या करियरची सुरुवात २००७ मध्ये आलेल्या चीरुथा चित्रपटामधून केली होती. रामचरण अभिनेता तर आहेच त्याचबरोबर तो एक बिजनेसमन देखील आहे.

चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण याचे लग्न १४ जून २०१२ मध्ये अपोलो हॉस्पिटल्सचे एग्जीक्यूटिव चेयरमन प्रताप सी. रेड्डीची नात उपासना कमिनेनी सोबत झाले आहे. अपोलो हॉस्पिटल्सचे देशभरामध्ये अनेक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स आहेत. याशिवाय देखील अनेक बिजनेस आहेत.

मुलगा रामचरण शिवाय चिरंजीवी यांना दोन मुली श्रीजा आणि सुष्मिता आहेत. सुष्मिताचे लग्न विष्णू प्रसाद सोबत २००६ मध्ये झाले होते. तर श्रीजाने शिरीष भारद्वाजसोबत २००७ मध्ये सीक्रेट मॅरेज केले होते पण नंतर दोघांमधील नाते बिघडू लागले. श्रीजाने शिरीषवर हुं-डा मागितल्याचा आरोप केला होता नंतर दोघांनी घटस्फोट घेतला. नंतर श्रीजाने कुटुंबियांचा संमतीने २०१६ मध्ये ज्वेलरी बिजनेसमन कल्याणसोबत लग्न केले.

चिरंजीवीचे वडील हवालदार होते, यामुळे त्यांचे नेहमी ट्रांसफर होत असायचे. हेच कारण आहे कि चिरंजीवी यांचे लहानपण गावामध्ये आपल्या आजी-आजोबांजवळ गेले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. कॉमर्समध्ये पदवी घेतल्यानंतर ते मद्रास फिल्म इंस्टीट्यूटमध्ये (१९७६) प्रवेश घेण्यासाठी चेन्नईला आले जेणेकरून अभिनयामध्ये आपले करियर बनवता यावे.

चिरंजीवी यांनी आपल्या करियरची सुरुवात पुनधिरल्लु या चित्रपटामधून केली पण त्यांचा पहिला रिलीज चित्रपट प्रणाम खरीदु आहे जो १९७८ मध्ये रिलीज झाला होता. यानंतर त्यांनी काही चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. १९८२ मध्ये आलेल्या इंटलो रामय्या वीडिलो कृष्णय्या चित्रपटामध्ये ते एक मुख्य अभिनेता म्हणून दिसले होते. हा चित्रपट सुपरहिट राहिला होता.

चिरंजीवी यांचा १९९२ मध्ये आलेला घराना मोगुडु हा पहिला असा तेलुगु चित्रपट आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर १० करोडची कमाई केली होती. त्यांना दहा वेळा फिल्मफेयर साउथ अवॉर्डने सन्मानित केले गेले आहे. ते असे पहिले अभिनेता आहेत ज्यांनी आपली स्वतःची वेबसाईट सुरु केली. त्यांनी यावर आपले इवेंट आणि चित्रपटांचे प्रमोशन करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.

चिरंजीवी यांनी चित्रपटांमध्ये नाव कमावल्यानंतर २००८ मध्ये राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यांनी आपली प्रजा राज्यम पार्टी स्थापन केली. नंतर त्यांची पार्टी कॉंग्रेसमध्ये विलीन झाली. त्यांचा मुलगा रामचरण देखील तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टार आहे. चिरंजीवीचे मुख्य चित्रपट पसिवादी प्रणाम (१९८७), यामूडीकी मोगुड़ू (१९८८), मांची डोंगा (१९८८), कोंडवेट्टी दोंगा (१९९०) सहित अनेक नावे आहेत. त्यांनी साउथसोबत बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले. प्रतिबंध (१९९०), आज का गुंडाराज (१९९०) ते पाहायला मिळाले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने