बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या चाहत्यांसाठी एक आनंदाचीत बातमी दिली आहे. सोशल मिडियावर नेहमी हा प्रश्न विचारला जात होता, जेव्हापासून या कपलचे लग्न झाले आहे, त्यानंतर हा प्रश्न विचारणे लोकांची एक जबाबदारीच बनली होती. प्रश्न हा होता कि अनुष्का-विराट बेबी प्लानिंग केव्हा करणार आहेत, पण हे सेलेब कपल आहे, सरप्राइज देणे यांना काही जास्तच पसंत आहे.

केली अनाउंसमेंट


विराट आणि अनुष्काने एक सुंदर फोटो शेयर केला आहे. ज्यामध्ये अनुष्काचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. दोघांनी एकच फोटो शेयर केला आहे, एकाच वेळी बातमी दिली आहे आणि एकच कॅप्शन देखील लिहिले आहे. अनुष्का-विराटने फोटोला कॅप्शन दिले आहे कि – आणि आम्ही आता तिघे, लवकरच येत आहे जानेवारी २०२१. पाहायला गेले तर लॉकडाऊन दरम्यान अनुष्का प्रेग्नंट होती आणि आता जेव्हा प्रेग्नंसीचे ४ ते ५ महिने गेले आहेत तेव्हा कुठे चाहत्यांना हि चांगली बातमी देण्यात आली आहे.

मिळत आहेत शुभेच्छा

अनुष्का-विराट यांच्यावर भरभरून शुभेछ्यांचा वर्षाव होत आहे. दोघेहि प्रसिद्ध क्षेत्रातून आहेत, त्यामुळे शुभेच्छा सर्व स्तरातून येत आहेत. खेळाच्या मैदानापासून ते बॉलीवूड पर्यंत. अनुष्का आणि विराटसाठी शुभेच्छा चालू आहेत. वरुण धवन पासून ते सानिया मिर्जाने देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय चाहते देखील त्यांना शुभेच्छा देत आहेत.

२०१७ मध्ये केले होते लग्न


अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे लग्न देखील सस्पें्सफुल राहिले होते. दोघांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये लग्न केले होते. दोघेही कुटुंबातील लोकांसोबत लग्नासाठी इटलीला गेले होते. इटलीमधील लग्नाबद्दल देखील कोणाला जास्त माहिती नव्हते. आता त्याचप्रकारे दोघांनी ४ महिन्यानंतर प्रेग्नंसीची बातमी दिली आहे. तथापि या कपलचे चाहते देखील आनंदात आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने