बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे त्याच्या अंतिम संस्काराला पोहोचली नव्हती. तिचे मानणे आहे कि सुशांतला या अवस्थेमध्ये पाहण्याची तिची ताकद नव्हती आणि ती याला कधीच विसरू शकली नसती. सुशांतचा अंतिम संस्कार मुंबईच्या पवन हंस स्म-शानभूमीत १५ जूनला झाला होता. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सांगितले कि एका पत्रकाराने सुशांतच्या निधनाची माहिती तिला दिली होती, ज्यामुळे ती स्तब्ध झाली होती.

एका न्यूज चॅनलशी बोलताना अंकिताने म्हंटले कि, मी झोपले होते आणि मला एका रिपोर्टरचा फोन आला ज्यामुळे मी उठले. सहसा मी ओळखीचे नसलेले फोन कॉल घेत नाही पण मी या रिपोर्टरचा कॉल उचलला. त्या रिपोर्टरने म्हंटले कि अंकिता, सुशांतने आ त्म ह त्याकेली आहे. हे ऐकून मी आतून संपले होते. काही असे होते कि ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही.

अंकिताने सांगितले कि यानंतर मी लगेच टीव्ही चालू केला आणि न्यूज पाहिली आणि तिथे सुशांतच्या मृत्यूबद्दल बातम्या दाखवल्या जात होत्या. अंकिताने म्हंटले कि, मला माहित नाही पुढे काय करायचे होते. मी फक्त हेच पाहत होते. याच्या दुसऱ्या दिवशी अंतिम संस्कारला जाण्याची माझी हिम्मत झाली नाही कारण मला माहित होते कि जर मी सुशांतला या अवस्थेमध्ये पाहिले असते तर मी त्याला आयुष्यभर विसरू शकले नसते. यामुळे मी ठरवलं कि त्याच्या अंतिम संस्कारला जायचे नाही.

अंकिताने सुशांतचे वडील केके सिंह आणि त्याच्या बहिणींची भेट घेतली होती आणि कुटुंबाची विचारपूस करण्यासाठी ती त्यांच्या घरी देखील गेली होती. सुशांतसोबत ब्रेकअप होऊन देखील ती त्याच्या बहिणींच्या संपर्कामध्ये होती.

अंकिताने म्हंटले, याशिवाय मला त्याच्या कुटुंबाला भेटायचे होते. मला फक्त याची काळजी घ्यायची होती कि ते ठीक आहेत. ज्याला जायचे होते तो निघून गेला पण त्याचे वडील होते, बहिणी होत्या आणि माझे कर्तव्य होते कि मी जाऊन त्यांना भेटावे. यामुळे मी त्यांना जाऊन भेटले आणि ते खूपच वेदनेमध्ये होते.

सुशांतच्या मृत्यूबद्दल उघडपणे बोलताना अंकिताने असे म्हंटले होते कि तो खूपच चंचल स्वभावाचा होता आणि कधीहि तणावामध्ये येऊन आ त्म ह त्या करणाऱ्यांपैकी नव्हता. अंकिताने हे देखील स्वीकार केले कि गेल्या चार वर्षांमध्ये ती सुशांतच्या संपर्कामध्ये नव्हती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने