बॉलीवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूतच्या निधनामुळे दुखी होती, पण आता तिच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे. हा आनंद तिने सोशल मिडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेयर केला आहे. अंकिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन छोट्या मुलांसमवेत एक फोटो शेयर केला आहे.

या फोटोमध्ये ती खूपच आनंदी पाहायला मिळत आहे. फोटो शेयर करण्याबरोबरच अंकिताने सांगितले कि तिच्या घरी दोन लहान सदस्यांचे (ट्विन्स) आगमन झाले आहे. ज्यांची नावे अबीर आणि अबीरा आहेत. तथापि यादरम्यान तिने हे सांगितले नाही कि हि दोन मुले कोणाची आहेत. फोटोमध्ये ती ट्विन्स मुलांना हातामध्ये घेतलेली पाहायला मिळत आहे. या खास प्रसंगी सेलिब्रिटीज अंकिताला शुभेच्छा देत आहेत.

याआधी अंकिताने इंस्टाग्रामवर सुशांतच्या आईचा फोटो शेयर केला होता. फोटो शेयर करताना अंकिताने लिहिले कि, अशा आहे कि तुम्ही दोघे एकत्र आहात. अंकिताच्या या पोस्टवर सुशांतची बहिण श्वेताने कमेंट केली आहे कि होय ते दोघे एकत्र आहेत, लव्ह यु बेबी, हिम्मत ठेवा. आपल्याला तोपर्यंत लढायचे आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही.

विशेष म्हणजे सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये पैशांसंबंधी देवाण-घेवाण बद्दल प्रवर्तन निदेशालय (ईडी) सोमवारी पुन्हा एकदा अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. शनिवारी रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीची १८ तास कसून चौकशी झाली आहे. तर रिया चक्रवर्तीची देखील प्रवर्तन निदेशालय (ईडी)ने आठ तास चौकशी केली होती आणि अनेक प्रश्न विचारले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने