सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास जस जसा पुढे जात आहे तस तसे प्रकरण आणखीन खोल जात आहे. सुशांतचे १४ जून रोजी निधन झाले होते, ज्याला आज दोन महिने पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला हे प्रकरण सु*सा*ई*ड सांगितले गेले होते पण जेव्हा सुशांतचे वडील केके सिंह यांनी पटनामध्ये रिया चक्रवर्ती आणि ५ इतर लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केली तेव्हा या प्रकरणाला वेगळे वळण लागले. सुशांतच्या निधनानंतर पहिल्यांदाच अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड विक्की जैनने सुशांतसाठी एक पोस्ट शेयर केली आहे.

अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड विक्की जैनने इंस्टाग्रामवर सुशांत सिंह राजपूतसाठी एक पोस्ट शेयर केली आहे. त्याने लिहिले आहे कि तुम्हा सर्वाना विनंती आहे कि १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुशांत सिंह राजपूतच्या प्रेयर मीटमध्ये सामील जरूर व्हा.

विक्कीच्या या पोस्टवर अंकिता लोखंडेने हार्ट इमोजी कमेंट केली आहे. सुशांतला या जगातून जाऊन दोन महिने झाल्यानंतर अंकिताने त्याच्या आठवणीत एक इमोशनल पोस्ट शेयर केली आहे. अंकिताने देखील आपल्या पोस्टमध्ये लोकांना १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ग्लोबल प्रेयरमध्ये सामील होण्यासाठी आणि सुशांतसाठी प्रार्थना करण्याची अपील केली आहे.

सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ती, भावाला न्याय मिळवून देण्यासाठी सीबीआय चौकशीची मागणी करीत आहे. श्वेताने सुशांतसाठी १५ ऑगस्टला एक ग्लोबल प्रेयर मीट ठेवले आहे. श्वेताने सर्वांना प्रेयर मीटचा भाग बनण्याची अपील केली आहे. सोशल मिडियावर पोस्ट शेयर करून लोकांना पाठिंबा देण्यासाठी अपील केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने