बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध डिस्को डांसर मिथुन चक्रवर्ती हे एक असे नाव आहे ज्यांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही, त्यांना जगभरामध्ये सर्व लोक मिथुन दा म्हणूनच ओळखतात. आपल्या उत्कृष्ठ डांसमुळे त्यांनी बॉलीवूडमध्ये चांगले नाव कमवले आणि आज देखील ते लोकांच्या मनावर राज्य करतात. मिथुन दा चा १६ जून १९५० रोजी कोलकाता येथे जन्म झाला होता.

मिथुन दा ६८ वर्षांचे झाले आहेत पण खूपच कमी लोकांना माहिती आहे कि त्यांचे खरे नाव मिथुन नाही आहे, त्यांच्या लहानपणीचे नाव गौरांग चक्रवर्ती होते. तथापि या नावाचा त्यांनी बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधीच वापर केला नाही. आज आम्ही या लेखामधून तुम्हाला सांगणार आहोत कि मिथुन दा यांनी आपले आलिशान हॉटेल बनवण्यासाठी ऊटीचीच निवड का केली.

तुमच्या माहितीसाठी सांगतो कि मिथुन दा आज जवळ जवळ २५० करोड रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. ते एक अभिनेता होण्याबरोबरच मोनार्क ग्रुप ऑफ हॉटेल्सचे मालक देखील आहेत. तामिळनाडूच्या ऊटी मसिणगुडी आणि कर्नाटकच्या म्हैसूर मध्ये त्यांचे लक्झरी हॉटेल आहेत. त्यांनी एका न्यूज वेबसाईटला मुलाखत देताना सांगितले होते कि त्यांनी आपले हॉटेल बनवण्यासाठी ऊटीची निवड का केली.

त्यांनी सांगितले कि त्यांचे जितके चित्रपट ऊटीमध्ये शूट झाले होते ते सर्व चित्रपट सुपरहिट राहिले होते, यामुळे त्यांना हे ठिकाण खूपच आवडू लागले होते आणि त्यांची इच्छा नव्हती कि हि जागा सोडून त्यांनी दुसरीकडे राहावे. हीच गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी निर्णय घेतला कि ऊटीमध्येच आलिशान हॉटेल बनवावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने