भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज आपला ३९ वा वाढदिवस साजरा करीत आहे. ७ जुलै १९८१ रोजी रांची येथे जन्मलेला महेंद्रसिंग धोनी भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारताला २ विश्वचषक जिंकून दिले आहेत. जरी धोनी ३९ वर्षांचा झाला असला तरी फॅन्स त्याला भारताकडून खेळताना पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे गेल्या महिन्यामध्ये १४ तारखेला निधन झाले होते. सुशांत सिंहने आपल्या करियरमध्ये सर्वात हिट चित्रपट एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी केला होता. जो भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर झाला होता. इतकेच नाही तर सुशांतने ज्याप्रकारे धोनीची भूमिका साकारली होती, त्यामुळे त्याचे दर्शकांकडून खूपच कौतुक झाले होते.

व्हायरल होत आहे जुना व्हिडिओ

धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचा आणि सुशांत सिंह राजपूतचा एक जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धोनी सुशांतसोबत सुपरस्टार रजनीकांतच्या घरी पाहायला मिळत आहे. वास्तविक हा व्हिडिओ चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीचा आहे. होय सुशांत आणि धोनीने एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी आणि त्याला तमिळमध्ये डब करण्याबद्दल रजनीकांतसोबत चर्चा केली होती.

व्हिडिओ पाहून भावूक झाले फॅन्स

धोनीने सुशांत सिंह राजपूतची भेट रजनीकांतसोबत करून दिली आणि सांगितले कि त्याची भूमिका हा साकारत आहे. यादरम्यान धोनी आणि रजनीकांत आपसात तमिळमध्ये काहीतरी बातचीत करत आहे. ज्याला सुशांत दूर बसून ऐकत आहे आणि यादरम्यान त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल देखील पाहायला मिळते. फॅन्स सुशांतचा हा व्हिडिओ पाहून खूपच इमोशनल होत आहेत.

पहा व्हिडिओ:

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने