टीव्हीवरील अभिनेत्री कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाहीत. टीव्हीच्या अनेक अभिनेत्रींनी टीव्ही सिरियल्ससोबत चित्रपटांमध्ये देखील काम करून खूपच लोकप्रियता मिळवली. चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावणाऱ्या अनेक टीव्ही अभिनेत्रींचे करियर काही खास राहिले नाही, तर काही अभिनेत्रींनी बॉलीवूडमध्ये आपली चांगली ओळख निर्माण केली. फक्त बॉलीवूडच नाही तर टीव्हीच्या अनेक अभिनेत्रींनी साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील आपले नाव कमवले. आज आम्ही तुम्हाला अशाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्यांनी साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूपच लोकप्रियता मिळवली.

अदिति शर्मा

गंगा आणि सिलसिला बदलते रिश्तो का सारख्या सिरियल्समध्ये पाहायला मिळालेली अभिनेत्री अदिति शर्मा बॉलीवूडच्या लेडीज वर्सेज रिकी बहल चित्रपटामध्ये पाहायला मिळाली होती. याशिवाय तिने अनेक साउथ इंडियन चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये गुंडे झल्लूमंडी, बबलू आणि ओम शांती सारखे चित्रपट सामील आहेत.

अनीता हसनंदानी

अनीता हसनंदानी टीव्ही जगतातील प्रसिद्ध चेहरा आहे. ती नागिन आणि ये है मोहब्बते सारख्या सिरियल्समध्ये पाहायला मिळाली आहे. याशिवाय बॉलीवूडमधील कृष्णा कॉटेज आणि कुछ तो है में चित्रपटामध्ये देखील तिने काम केले आहे. याशिवाय तिने अनेक साउथ इंडियन चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. यामध्ये तिला दर्शकांनी खूपच पसंती दिली.

एरिका फर्नांडेज

एरिका टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कसौटी आणि कुछ रंग प्यार के सारख्या सिरियल्समध्ये देखील काम केले आहे. इतकेच नाही तर ती साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने तमिळ, कन्नड आणि तेलुगु भाषेतील जवळ जवळ ७ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हंसिका मोटवानी

लहान मुलांचा प्रसिद्ध टीव्ही शो शाका लाका बूम बूम मध्ये हंसिका पाहायला मिळाली होती. याशिवाय तिने ऋतिक रोशनच्या कोई मिल गया चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. तसे तर ती बॉलीवूडपासून बराच काळ दूर राहील, पण आता ती साउथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

श्रद्धा आर्या

टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या कुंडली भाग्य, कुमकुम भाग्य, तुम्हारी पाखी, ड्रीम गर्ल सारख्या सिरियल्समध्ये पाहायला मिळाली आहे. याशिवाय ती साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती साउथच्या अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली आहे, तिने साउथमध्ये चांगली लोकप्रियता मिळवली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने