बॉलीवूडचे सर्वात मोठे सत्य हे आहे कि इथे कोणताही कलाकार जास्त काळ आपली लोकप्रियता टिकवू शकत नाही. बॉलीवूडसाठी एक म्हण अशी आहे कि स्टार बनणे सोपे आहे पण स्टारडम टिकवणे अवघड आहे. आपल्याला असे खूपच कमी कलाकार पाहायला मिळतील, जे आपल्या करियरच्या सुरुवातीपासून आतापर्यंत आपली लोकप्रियता टिकवून घेतलेले आहेत. आज आम्ही बॉलीवूडमधील अशाच काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत जे पदार्पणातच खूप लोकप्रिय झाले होते. पण काही काळामध्ये त्यांची लोकप्रियता कमी झाली.

राहुल रॉय

१९९० मध्ये आलेल्या आशिकी चित्रपटामधून राहुल रॉयने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट जबरदस्त हिट राहिला होता. तथापि हा चित्रपट इतका सुपरहिट राहील याचा अंदाज राहुल रॉयला कधीच नव्हता. पण असे असूनहि राहुलला बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सफलता मिळाली नाही. यानंतर तो हळू हळू बॉलीवूड इंडस्ट्रीमधून गायब झाला.

अमीषा पटेल

अमीषा पटेल बॉलीवूडमधील सुदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने २००० मध्ये कहो ना प्यार है चित्रपटामधून डेब्यू केला होता, हा चित्रपट सुपरहिट झाला होता. यानंतर २००१ मध्ये तिने सनी देओलसोबत गदर: एक प्रेम कथा चित्रपटामध्ये काम केले. हा चित्रपट देखील सुपरहिट झाला. पण दोन्ही चित्रपट हिट होऊन देखील अमिषा आपल्या करियरमध्ये सफलता मिळवू शकली नाही.

अनु अग्रवाल

आशिकी चित्रपटामध्ये राहुल रॉयसोबत डेब्यू करणारी अनु अग्रवाल आज अज्ञात आयुष्य जगत आहे. पहिल्या चित्रपटानंतर ती रातोरात स्टार बनली होती. यानंतर १९९९ मध्ये तिचा अ प घा त झाला होता. ज्यामध्ये तिची स्मृती गेली होती, त्यावेळी ती १ महिना को मा मध्ये होती. यानंतर ती पुन्हा कधी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली नाही.

कुमार गौरव

प्रसिद्ध अभिनेता राजेंद्र कुमारचा मुलगा कुमार गौरवने १९८१ मध्ये लव स्टोरी चित्रपटामधून डेब्यू केला होता. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. आपल्या पहिल्या चित्रपटामधून कुमार गौरव स्टार बनला होता. तथापि यानंतर त्याने अनेक चित्रपट केले पण त्याला इतकी सफलता मिळाली नाही. आज तो बॉलीवूडपासून दूर आहे.

भाग्यश्री

मैने प्यार किया चित्रपटामधून डेब्यू करणारी अभिनेत्री भाग्यश्री या चित्रपटामधून स्टार बनली होती. या चित्रपटाने तिला अमाप लोकप्रियता मिळवून दिली. सर्वाना वाटत होते कि ती त्या काळातील सर्व अभिनेत्रींना मागे टाकेल पण असे झाले नाही. लग्नानंतर तिचे करियर संपुष्टात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने