बॉलीवूड फिल्मी जगतामध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या चित्रपटामधील अभिनेत्रीसोबत प्रेम झाल्यामुळे लग्न करून संसार थाटला. अशाप्रकारे आज आम्ही तुम्हाला टीव्हीवरील काही कलाकारांबद्दल सांगणार आहोत जे आधीच विवाहित होते पण शुटींग दरम्यान आपल्या को-स्टारवर प्रेम झाल्यामुळे त्यांनी आपल्या पहिला जोडीदाराला सोडून दुसऱ्यासोबत लग्न केले. या लिस्टमध्ये अनेक मोठ्या मोठ्या कलाकारांची नावे आहेत.

१. दीपिका कक्कड़ आणि शोएब इब्राहिम

टीव्ही जगतातील लोकप्रिय शो ससुराल सिमर का मधील अभिनेत्री आणि बिग बॉस विनर दीपिका कक्कडने २०१८ मध्ये आपला बॉयफ्रेंड शोएब इब्राहिमसोबत लग्न केले होते. दोघांची भेट ससुराल सिमर का च्या सेटवर झाली होती. याआधी दीपिकाचे लग्न रौनक सैमसनसोबत २०११ मध्ये झाले होते पण २०१५ मध्ये ते वेगळे झाले.

२. हितेन तेजवानी आणि गौरी प्रधान

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता हितेन तेजवानीबद्दल खूपच कमी लोकांना माहित आहे कि त्याने दोनवेळा लग्न केला आहे. हितेनने स्वतः एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि त्याचे पहिले अरेंज मॅरेज झाले होते त्यांच्यामध्ये प्रेम नव्हते आणि लग्नाच्या ११ महिन्यानंतर त्यांचे नाते संपुष्टात आले. यानंतर त्याची भेट अभिनेत्री गौरी प्रधानसोबत झाली. दोघांनी एकत्र कुटुंब आणि क्योंकि सास भी कभी बहू थी मध्ये काम केले. दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले आणि २००४ मध्ये त्यांनी लग्न केले. दोघांना जुळी मुले आहेत.

३. करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बसु

टीव्ही जगतामधून बॉलीवूड जगतामध्ये आलेला अभिनेता करण सिंह ग्रोवरने २०१६ मध्ये अभिनेत्री बिपाशा बसुसोबत लग्न केले. हे करणचे तिसरे लग्न होते. बिपाशाअगोदर त्याने अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत २०१२ मध्ये लग्न केले होते पण २०१४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. करण आणि बिपाशाने अलोन चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते ज्यानंतर दोघे एकमेकांवर प्रेम करू लागले आणि २०१६ मध्ये त्यांनी लग्न केले. करणने पहिले लग्न २ डिसेंबर २००८ मध्ये अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत केले होते पण १० महिन्यामध्येच त्यांचे नाते संपले.

४. राम कपूर आणि गौतमी कपूर

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध जोडींपैकी एक आहे राम कपूर आणि गौतमीची जोडी, दोघांची भेट घर एक मंदिर सिरीयलच्या सेटवर झाली होती आणि दोघांनाही एकमेकांवर प्रेम झाले. यावेळी गौतमी आधीच विवाहित होती. तिचे लग्न फोटोग्राफर मधुर श्रॉफसोबत झाले होते, पण दोघांचे लग्न टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले. यानंतर २००३ मध्ये गौतमीने राम कपूरसोबत लग्न केले. दोघांना दोन मुले आहेत.

५. समीर सोनी आणि नीलम कोठारी

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेता समीरने अनेक टीव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे, समीरने १९९६ मध्ये राजलक्ष्मी खानविलकरसोबत लग्न केले होते. दोघांची भेट मॉडेलिंग दरम्यान झाली होती. यांचे लग्न जास्त काळ टिकले नाही आणि ६ महिन्यात दोघे वेगळे झाले. घटस्फोटानंतर अभिनेता समीर सोनीने जवळ जवळ १४ वर्षे लग्न केले नाही. यानंतर त्याची भेट फेमस अभिनेत्री नीलम कोठारीशी झाली आणि २४ जानेवारी २०११ मध्ये दोघांनी लग्न केले. नीलमचे देखील हे दुसरे लग्न होते. समीरच्या अगोदर तिने २००० मध्ये ऋषी सेथियासोबत लग्न केले होते पण नंतर दोघांनी घटस्फोट घेतला. समीर आणि नीलमला एक मुलगी आहना आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने