बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पैसा कमावणे इतके सोपे नाही. सामान्य माणसाला आपल्या टॅलेंटच्या जोरावर ओळख बनवण्यासाठी अनेक वर्षे घालवावी लागतात तेव्हा कुठे त्यांना संधी मिळते. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये तीन प्रकारचे चित्रपट बनतात. ए ग्रेड, बी ग्रेड आणि सी ग्रेड. ए ग्रेड चित्रपट म्हणजे जे आपल्या कुटुंबासोबत बसून पाहू शकतो असे चित्रपट, बी ग्रेड चित्रपट आपण कुटुंबासोबत बसून पाहू शकत नाही. बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि आज त्या बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत, पण याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही. चला तर मग या लेखामधून आपण त्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत.

या ५ अभिनेत्रींनी केले आहे बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम

१. अर्चना पूरन सिंह

टेलिव्हिजन इंडस्ट्रीची प्रसिद्ध जज अर्चना पूरन सिंहबद्दल तर आपल्याला माहितच असेल, पण तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि तिने बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे. करियरच्या सुरुवातीला तिने बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आणि हळू हळू ती बॉलीवूडमध्ये लोकप्रिय होत गेली. आज ती आपल्या हास्याने दुसऱ्यांना हसवण्यासाठी ओळखली जाते.

२. पायल रोहतगी

पायल रोहतगी बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पायल रोहतगीने अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे पण लोक तिला ओळखू शकले नाही, पण जेव्हा तिने २००८ मध्ये बिग बॉसमध्ये भाग घेतला तेव्हा ती प्रसिद्ध झाली.

३. नेहा धूपिया

नुकतेच आई बनलेली नेहा गेल्या काही दिवसांपासून खूपच चर्चेमध्ये आहे. गेल्या वर्षी तिने आपला बॉयफ्रेंड अंगद बेदीसोबत गुपचूप लग्न केले होते. कदाचित तुम्हाला माहिती असेल कि नेहा धुपियाने देखील बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले आहे.

४. सिल्क स्मिता

एक काळ होता जेव्हा सिल्क स्मिता आपल्या अभिनयाच्या जोरावर फिल्मी जगतावर अधिराज्य गाजवत होती आणि ती चित्रपटांमध्ये बोल्ड सीन देण्यासाठी प्रसिद्ध होती. तिने देखील आपल्या करियरच्या सुरुवातीला बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले.

५. सना खान

बॉलीवूडमधील सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक सना खानला तर आपण ओळखत असाल. ती सोशल मिडियावर खूपच अॅक्टिव राहते. ती बिग बॉसची कंटेस्टेंट देखील राहिली आहे. याशिवाय तिने अनेक बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ती बॉलीवूडमध्ये लोकप्रिय झाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने