जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रभाव काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. हजारो लोक या व्हायरसचा शिकार होत आहेत. या महामारीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये देखील याचा प्रभाव कमी होत नाही आहे. सरकारने लोकांच्या सुविधा आणि गरजांना लक्षात घेऊन लॉकडाउन नंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. असे असताना बॉलीवूड सेलेब्स देखील आवश्यकतेनुसार घरातून बाहेर पडत आहेत. अशामध्ये टीव्ही शोजची शुटींग देखील सुरु झाली आहे आणि लवकरच दर्शकांना नवीन एपिसोड टीव्हीवर पाहायला मिळणार आहेत. टीव्हीचा मोस्ट पॉपुलर शो तारक मेहता का उल्टा चश्मा ची शुटींग देखील सुरु झाली आहे. यादरम्यान शोमध्ये माधवी भाभीची भूमिका साकारणारी सोनालिका जोशीचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

११६ दिवसांनंतर तारक मेहता का उल्टा चश्मा ची शुटींग १० जुलैला सुरु झाली. शूटच्या दरम्यान प्रोड्युसर द्वारे सर्व कलाकारांच्या सेफ्टीची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे. सर्व सेलेब्स शो बद्दल खूप उत्साहित आहेत. तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये गोकुलधाम सोसायटीचे सेक्रेटरी आणि ट्यूशन टीचर आत्माराम तुकाराम भिड़ेची पत्नी माधवीची भूमिका साकारणारी सोनालिका गेल्या १२ वर्षांपासून या शोशी जोडली गेली आहे.

शोमध्ये आपल्या सोज्वळतेने दर्शकांचे मन जिंकणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यामध्ये खूपच ग्लॅमरस आहे. रील लाईफमध्ये पापड आणि लोणचे बनवण्याची आवड असणारी सोनालिका इंस्टाग्रामवर सध्या आपले सुंदर आणि बोल्ड अंदाजामधील फोटो शेयर करत असते. सि गा रे ट ओढतानाचे तिचे काही फोटोज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

महाराष्ट्रामध्ये जन्मलेली सोनालिकाचा जन्म ५ जून १९७६ रोजी झाला होता. सोनालिकाने कॉलेजचे शिक्षण यूनिवर्सिटी ऑफ मुंबई येथून पूर्ण केले. तिने आपल्या करियरची सुरुवात मराठी थियेटर पासून केली होती. तारक मेहता का उल्टा चश्मा मधील माधवी भिडेची भूमिका साकारण्यापूर्वी ती वारस सरेच सरस आणि जुलुक सारख्या मराठी सिरियल्समध्ये देखील पाहायला मिळाली होती.

सिरीयलमध्ये आत्माराम भिडेची पत्नी आणि एक मुलगी सोनूची आई माधवी खऱ्या आयुष्यामध्ये विवाहित आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार सोनालिकाने ५ एप्रिल २००४ रोजी समीर जोशी सोबत लग्न केले होते. या जोडीला एक मुलगी आहे, जिचे नाव आर्या जोशी आहे.

सिरीयलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साडीमध्ये पाहायला मिळणारी सोनालिका आपल्या साधेपणा आणि बोलण्याच्या शैलीमुळे दर्शकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. एक रिपोर्टनुसार या शोमध्ये अभिनयासाठी ती प्रत्येक दिवसाचे २५ हजार रुपये चार्ज करते.

वेगवेगळ्या आउटफिटमध्ये फोटोशूट करण्याची आवड असणारी सोनालिकाला गाड्यांची देखील खूप आवड आहे. काही काळापूर्वी तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेयर केला होता ज्यामध्ये ती आपल्या नव्या गाडीसोबत दिसत होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने