सुशांतच्या निधनानंतरच बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये इनसाइडर्स आणि आउटसाइडर्समध्ये वाद सुरु आहे, कंगना रनौतने नुकतेच आपल्या मुलाखतीमध्ये सुशांतच्या मृत्यूला प्लॅनड म-र्डर म्हंटले आहे, या मुलाखतीदरम्यानच तिने तापसी पन्नू आणि स्वरा भास्कर सारख्या कलाकारांना बी-ग्रेड अभिनेत्री म्हणताना चापलूस देखील म्हंटले होते, याचे उत्तर देताना तापसी आणि स्वराने देखील प्रतिउत्तर दिले, तिन्ही अभिनेत्रींमध्ये सध्या वाद पाहायला मिळत आहे. आता स्वरा भास्करने सुशांतच्या कुटुंबियांची सोशल मिडियावर माफी मागितली आहे.

कुटुंबियांची मागितली माफी

स्वरा भास्करने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, मी आत्ममंथन केले आणि मला या गोष्टीची जाणीव झाली कि सुशांतच्या कुटुंबीयांनी जितक्या वेळा त्यांचे नाव आमच्या वादामध्ये ऐकले आहे, त्यानुसार आम्हाला त्यांची माफी मागायला हवी, हे आमच्याबद्दल नाही आहे, सुशांतचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, आपल्याला त्याच्या आठवणींना साजरे केले पाहिजे आणि विनम्र व्हायला हवे.

तापसी, कंगना आणि स्वरामध्ये ट्विटर वॉर

सोशल मिडियावर कंगनाच्या डिजिटल टीमसोबत चर्चेदरम्यान तापसी आणि स्वराने आपल्या प्रतिक्रियांदरम्यान अनेक वेळा सुशांतच्या नावाचा उल्लेख केला होता, याला स्वराने वैयक्तिकरित्या चुकीचे मानले आहे, स्वराच्या या ट्वीटनंतर अनेक लोकांनी तिचे कौतुक केले आहे, तर अनेकांनी तिच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर काही लोक असे देखील आहे जे म्हणत आहे कि स्वरा आणि तिच्यासारख्या कलाकारांनी सुशांतच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे.

२४ जुलै रोजी प्रदर्शित होणार शेवटचा चित्रपट

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा २४ जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सुशांतसोबत संजना सांघी मुख्य भूमिकेमध्ये आहेत, चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाबडाने केला आहे, चाहते या चित्रपटाबद्दल खूपच उत्साही आहेत, ते आपल्या आवडत्या स्टारला स्क्रीनवर पाहण्यासाठी वाट पाहत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने