सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आपल्या राहत्या घरी आ त्म ह त्याकेली होती. सुशांतने उचललेल्या या पावलामुळे प्रत्येकजण हैराण आहे. सुशांतने इतके मोठे पाऊल का उचलले अजूनपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. तर सुशांतच्या जाण्यानंतर त्याचे जुने फोटो आणि व्हिडिओ खूपच व्हायरल झाले आहेत. यादरम्यान अभिनेत्याच्या टॅटूचा एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

या फोटोमध्ये आपण पाहू शकता कि सुशांतच्या पाठीवर एक टॅटू दिसत आहे. आता या टॅटूबद्दल एक मोठा खुलासा समोर आला आहे. हा टॅटू बनवण्यामागे कारणही तितकेच खास आहे.

सुशांत सिंह राजपूतने आपल्या या टॅटूबद्दल स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. हा टॅटू त्याने ४ वर्षांपूर्वी काढून घेतला होता. जेव्हा सुशांत शाळेमध्ये होता, त्यावेळी त्याच्या आईचे निधन झाले होते. सुशांत घरातील एकुलता एक मुलगा होता आणि तो कुटुंबाचा लाडका होता. आईच्या खूपच जवळ असलेल्या सुशांतने टॅटूदेखील आपल्या आईसंबंधित बनवून घेतला होता.

२०१६ मध्ये हा टॅटू एका खास संदेशासोबत सुशांतने आपल्या पाठीवर बनवून घेतला होता. सुशांत सिंह राजपूतच्या या टॅटूमध्ये एक वर्तुळ आणि त्यामध्ये एक त्रिकोण बनवला गेला आहे. ज्यामध्ये एक बाळ आणि आईचे चित्र आहे. हा टॅटू ग-र्भाचे प्रतिक आहे. या टॅटूचा फोटो शेयर करताना सुशांतने लिहिले होते कि पहिला हा टॅटू, पंचतत्व आणि मी आणि आई.

सुशांतच्या आ त्म ह त्याप्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत ३५ पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली आहे. इतकेच नाही तर या प्रकरणामध्ये बांद्रा पोलीस व्यावसायिक स्पर्धेच्या आधारे देखील तपास करत आहेत. ३४ वर्षीय सुशांतने मुंबई येथील बांद्रा स्थित आपल्या घरामध्ये ग ळ फा सघेऊन आ त्म ह त्याकेली होती. टीव्ही पासून बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलेल्या सुशांतने शुद्ध देसी रोमांस, राबता, छिछोरे, केदारनाथ आणि सोनचिड़िया सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. त्याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा २४ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने