बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जूनच्या सकाळी ग ळ फा सघेऊन आ त्म ह त्याकेली होती. यानंतर चाहते सतत सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. अनेक बॉलीवूड सेलेब्स देखील या प्रकरणामध्ये समोर आले आहेत. सुशांत सिंह राजपूतचे जुने फोटो व्हिडिओ शेयर करून न्यायाची मागणी केली जात आहे. आता दिवंगत अभिनेता सुशांतच्या वडिलांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अभिनेत्रीवर आरोप लावले आहेत कि तिने हळू-हळू सुशांतला कुटुंबापासून दूर केले. सुशांत कडून पैसे घेतले आणि त्याला आ त्म ह त्येस प्रवृत्त केले.

यानंतर लगेच सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने एक पोस्ट शेयर केली आहे. तिने लिहिले आहे कि जर खऱ्याने काही फरक पडत नाही तर काहीच फरक पडत नाही. श्वेता सिंह कीर्तीची हि पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सुशांतच्या वडिलांनी एफआईआरमध्ये रियावर आरोप लावले आहेत कि सुशांतचे सर्व बँक अकाउंट्स आणि कार्ड्स, रिया आणि तिच्या निकटवर्तीयांच्या कंट्रोलमध्ये होते. सुशांतने अनेक वेळा सांगितले कि हे लोक मला वेड्याच्या दवाखान्यात घालू इच्छित होते आणि तो काहीही करण्यास असमर्थ होता. सुशांत जेव्हा आपल्या बहिणींना भेटण्यासाठी गेला तेव्हा रियाने त्याला मुंबईला परत येण्यासाठी दबाव टाकला. यानंतर सुशांतसोबत कुटुंबाचा संपर्क देखील कमी होऊ लागला.

एफआईआरमध्ये केके सिंहने हे देखील सांगितले आहे कि २०१९ च्या आधी जेव्हा माझा मुलगा सुशांतला कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती तेव्हा रिया चक्रवर्तीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर असे अचानक काय झाले? सुशांत सिंह अशा कोणत्या मानसिक समस्येचा सामना करत होता याची चौकशी व्हावी. जर सुशांत सिंह राजपूतचा उपचार सुरू होता तर याबद्दल त्याच्या कुटुंबियांकडून लिखित किंवा मौखिक अनुमती का घेतली नाही. कारण जेव्हा मानसिक रूपाने कोणी आजारी असतो तेव्हा त्याचे सर्व अधिकार त्याच्या कुटुंबियांजवळ असतात, याची चौकशी केली जावी.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने