सुशांत सिंह राजपूतच्या सोनचिडिया चित्रपटाचा उल्लेख संस्मरणीय चित्रपटांमध्ये नक्कीच होतो. हा चित्रपट त्याचा आवडता चित्रपट होता आणि आता याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि थिएटरमध्ये (जेव्हा उघडतील) पुन्हा रिलीज करण्याची तयारी सुरु झाली आहे. हा चित्रपट फेब्रुवारी २०१९ मध्ये पहिल्यांदा रिलीज झाला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मिडियावर त्याचे अनेक जुने फोटो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या दरम्यान सोनचिडिया चित्रपटाच्या सेटवरचा त्याचा एक जुना व्हिडिओ सध्या लोकांच्या चर्चेचा विषय बनला आहे.

सोनचिडियाचा उल्लेख होताच सुशांतच्या चेहऱ्यावर नेहमी हसू येत होते. सुशांतने अनेक वेळा स्पष्ट केले होते कि चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट होवो किंवा न होवो त्याला काही फरक पडत नव्हता. तो फक्त स्वतःच्या समाधानासाठी काम करत होता, अन्यथा पैसे तर इतर एखाद्या व्यवसायात देखील मिळाले असते. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सुशांत डाकूच्या वेशामध्ये दिसत आहे.

सुशांतच्या हृदयाच्या खूपच जवळ होता सोनचिडिया चित्रपट

याबरोबर तो एक बालकलाकाराला प्रेमाने खाऊ घालताना दिसत आहे. सुशांतचा हा स्नेहभाव पाहून फॅन्स भावूक होत आहेत. ज्या मुलीला सुशांत खाऊ घालत तिने देखील सोनचिडिया चित्रपटामध्ये काम केले होते. सुशांतच्या फिल्मी करियरमध्ये सोनचिडिया त्याच्या हृदयाच्या सर्वात जवळचा चित्रपट होता.

सुशांत सिंह राजपूतने चित्रपटामध्ये साकारली डाकूची भूमिका

चित्रपटामध्ये सुशांत सिंह राजपूतने लखनाची भूमिका साकारली होती. चित्रपटाला क्रिटिक्सकडून चांगले रिव्ह्यू मिळाले होते, पण बॉक्स ऑफिसवर सोनचिडिया काही खास कमाल दाखवू शकला नाही. २०१९ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटामध्ये सुशांतसोबत मनोज बाजपेयी, भूमि पेडनेकर, रणवीर शौरी सारखे कलाकार दिसले होते. चित्रपटामधील सुशांतच्या अभिनयाचे देखील दर्शकांनी कौतुक केले होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने