सुशांत सिंह राजपूचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा मधील हिरोईन संजना सांघी बुधवारी मुंबईहून आपल्या घरी दिल्लीला परतली. याआधी मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आ त्म ह त्या प्रकरणात तिची चौकशी केली होती. संजनाने मुंबई सोडताना इशाऱ्यामध्ये हि गोष्ट देखील सांगितली कि आता ती क्वचितच मुंबईला परतणार आहे. वास्तविक संजनाने हि गोष्ट मुंबईहून फ्लाइट पकडताना आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये लिहिली आहे.

संजना सांघीने आपल्या इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले आहे कि, खुदा हाफिज मुंबई, ४ महिन्यानंतर आपले दर्शन झाले, मी चालले दिल्लीला परत, तुमचे रस्ते काही वेगळेच वाटले, सुमसान वाटले, कदाचित माझ्या हृदयामध्ये जे दुख आहे, माझा दृष्टीकोन बदलत आहेत. किंवा कदाचित याक्षणी तुम्ही देखील दुखी आहात. भेटूयात? लवकरच किंवा नाही.

सुशांत सिंह राजपूत आ त्म ह त्या प्रकरणामध्ये पोलिसांनी मंगळवारी संजना सांघीसोबत बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये जवळ जवळ ९ तास चौकशी केली होती. पोलिसांनी संजनाला सोमवारीच समन्स बजावले होते पण ती मुंबईमध्ये नसल्यामुळे पोहोचू शकली नाही.

सुमारे दोन वर्षांपूर्वी मीटू कॅम्पेन दरम्यान बातमी आली होती कि संजनाने सुशांतवर छेडछाड केल्याचा आरोप लावला होता. तथापि सुशांतने याचे खंडन करताना दोघांमधील झालेल्या संभाषणाचे काही स्क्रीनशॉट शेअर केले होते. नंतर संजनाने देखील सुशांतवर लागलेल्या आरोपांना चुकीचे असल्याचे सांगितले होते.

याआधी संजनाने रविवारी इंस्टाग्रामवर एक पोस्टसोबत व्हॉईस मेसेज देखील शेयर केला होता, ज्यामध्ये तिने दिल बेचारा चित्रपटाच्या डिजिटल रिलीजला विरोध न करण्याची अपील केली होती. संजनाने म्हंटले होते कि हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीजसाठी बनला होता पण कोरोनामुळे चित्रपटाचे रिलीज पुढे ढकलले.

सुशांतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा २४ जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २३ वर्षाच्या संजनाचा पहिला बॉलीवूड चित्रपट आहे. याचे डायरेक्टर मुकेश छाबडा आहेत. हा चित्रपट द फॉल्ट इन आवर स्टार्सचा हिंदी रिमेक आहे.

२०११ मध्ये आलेल्या रॉकस्टार चित्रपटामधून संजनाने बॉलीवूडमध्ये डेब्यू केला होता, ज्यानंतर ती २०१६ मध्ये रिलीज झालेल्या हिंदी मीडियम चित्रपटामध्ये पाहायला मिळाली. फुकरे रिटर्न चित्रपटामध्ये देखील संजनाने काम केले होते. तथापि लीड रोलमध्ये संजना दिल बेचारा चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने