बऱ्याच काळाच्या प्रतीक्षेनंतर ज्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याची दर्शक आतुरतेने वाट पाहत होते, त्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. होय आम्ही बोलत आहोत सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा बद्दल, ज्याचा ट्रेलर काही वेळापूर्वी प्रदर्शित करण्यात आला आहे. तसे मेकर्सने आधीच घोषणा केली होती कि चित्रपटाचा ट्रेलर ६ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे, अशामध्ये प्रत्येकजण या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होता आणि दिल बेचारा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

दिल बेचारा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच एकापेक्षा एक रेकॉर्ड मोडीत निघत आहेत, होय तुम्हाला विश्वास बसणार नाही कि चित्रपटाच्या ट्रेलरने फक्त एका तासामध्ये एक मोठा कारनामा केला आहे. दिल बेचारा चित्रपटाच्या ट्रेलरला एका तासामध्ये तब्बल १ मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत, जो एक मोठा रेकॉर्ड आहे. दिल बेचारा असा पहिला चित्रपट बनला आहे ज्याच्या ट्रेलरला अवघ्या एका तासामध्ये १ मिलियन पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

या चित्रपटाचा ट्रेलर खूपच इमोशनल आहे, ज्यामध्ये सुशांत सिंह राजपूत सोबत संजना सांघी मुख्य भूमिकेमध्ये आहे. ट्रेलरमध्ये कँ स र नावाच्या खतरनाक आजाराशी सामना करताना अभिनेत्री पाहायला मिळत आहे. लोकांना या चित्रपटाचा ट्रेलर खूपच पसंत येऊ लागला आहे, तर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर देखील ट्रेंड करत आहे.

सुशांत सिंह राजपूतचा हा चित्रपट २४ जुलैला डिज्नी प्लस हॉटस्टार प्लॅटफॉर्म प्रदर्शित होणार आहे. तसे हा सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट असल्यामुळे या चित्रपटासाठी लोक खूपच बेचैन आहेत जो २४ जुलैला पाहायला मिळणार आहे.

व्हिडीओ पहा:

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने