जसे कि आपल्याला माहिती आहे कि सूर्या तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. ज्याचे पूर्ण नाव सूर्या शिवकुमार असे आहे. सूर्याचा जन्म ३० जुलै १९७५ रोजी चेन्नईमध्ये झाला होता आणि त्याने आपल्या फिल्मी करियरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ज्यानंतर सूर्याला आता तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. आज आपण सूर्याच्या वैयक्तिक आयुष्यामधील काही रंजक किस्से जाणून घेणार आहोत, जे त्याच्या अनेक चाहत्यांना माहिती नाहीत.

कधी काळी फॅक्ट्रीमध्ये काम करत होता सूर्या

तुम्हाला हे जाणून हैराणी होईल कि फिल्मी दुनियेमध्ये येण्यापूर्वी सूर्याने खूपच संघर्ष केला आहे आणि त्याने आपल्या करियरच्या सुरुवातीच्या काळामध्ये एका कपड्याच्या फॅक्ट्रीमध्ये देखील काम केले आहे. यादरम्यान त्याने आपली ओळख लपवून ठेवली होती.

फॅक्ट्रीमध्ये त्याला प्रत्येक महिन्याला १००० रुपये दिले जात होते. आपल्या एका मुलाखतीदरम्यान सूर्याने आपल्या संघर्षाबद्दल सांगताना म्हंटले होते कि त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूपच परिश्रम घेतले आहेत आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने हे स्थान मिळवले आहे.

सूर्याने आपल्या फिल्मी करियरची सुरुवात १९९७ मध्ये नेररुक्कु नेर या चित्रपटामधून केली होती. पण त्याला सर्वात जास्त लोकप्रियता नंदा चित्रपटामधून मिळाली होती आणि या चित्रपटासाठी सूर्याला बेस्ट अभिनेत्याचा तामिळनाडू स्टेट फिल्म पुरस्कार देखील देण्यात आला होता.

आज सूर्या तमिळ फिल्म इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त फीस घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. २००६ मध्ये सूर्याने अभिनेत्री ज्योतिकासोबत लग्न केले आणि आता सूर्या आपल्या विवाहित आयुष्यामध्ये खूप आनंदी आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने