बॉलीवूडचे जग अनेक कलाकारांनी भरलेले आहे. प्रत्येक कलाकार आपल्या कामाने दर्शकांचे मन जिंकतो. या गर्दीमध्ये काही कलाकार काळाच्या अगोदरच अज्ञात होतात तर काही कलाकार बॉलीवूडचा निरोप घेतल्यानंतर देखील नेहमी चर्चेमध्ये राहत असतात. इथे कोणी एक सुपरहिट चित्रपट देऊन सुपरस्टार बनतो तर एक फ्लॉप चित्रपट केल्यानंतर त्याची प्रतिमा बिघडते. इथे सफलता कायमस्वरूपी नसते, तर प्रत्येक चित्रपट एक आव्हान असतो.

याशिवाय चित्रपट नावाने देखील विकले जातात, पण आज आम्ही तुम्हाला एक अशा सुपरस्टार बद्दल सांगणार आहोत, ज्याला आता जास्त चित्रपट मिळत नाहीत, पण तरीही तो सुपरस्टार आहे. चला तर जाणून घेऊया तो कोण असा एकमेव कलाकार आहे ज्याला चित्रपट मिळत नाही पण तरीही तो सुपरस्टार आहे.

आम्ही इथे ज्या कलाकाराबद्दल बोलत आहोत त्याचे नाव सुनील शेट्टी आहे. आपल्या काळामध्ये टॉपचा कलाकार राहिलेल्या सुनील शेट्टीने आता बॉलीवूडचा निरोप घेतला आहे किंवा असे देखील म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही कि आता चित्रपट मिळत नाहीत. सुनील शेट्टी अॅ क्शन हिरो म्हणून ओळखला जात होता. एका काळामध्ये त्याचे चित्रपट दर्शकांच्या मनावर राज्य करत होते. आजदेखील लोक त्याचे चित्रपट पाहून कौतुक करतात. असे मानले जाते कि त्याच्याजवळ जे काही आहे ते त्याच्या चित्रपटातील आवाजामुळे आहे. सुनील शेट्टीचा आवाज खूपच दमदार आहे, ज्यामुळे शत्रू देखील घाबरतो.

चित्रपट नाहीत पण यशस्वी आहे सुनील शेट्टी

आपल्या काळामध्ये सुपरस्टार राहिलेल्या सुनील शेट्टीला आता चित्रपट मिळत नाहीत. भलेहि त्याच्या जवळ चित्रपट नसतील पण खऱ्या आयुष्यामध्ये सर्वात सफल अभिनेत्यांपैकी तो एक आहे. होय त्याची गणना भारतातील एकमेव कलाकाराच्या रुपामध्ये होते जो चित्रपट मिळत नसताना देखील प्रत्येक वर्षी १०० करोड रुपये कमावतो. सुनील शेट्टी एक सफल अभिनेता तर आहेच, पण तो एक बिजनेसमॅन देखील आहे. सुनील शेट्टी मुंबईच्या पॉश भागात एच २० नावाने एक बार आणि रेस्टॉरंट चालवतो.

अनेक कंपन्यांचा मालक आहे सुनील शेट्टी

सुनील शेट्टीचे रेस्टॉरंट फक्त मुंबई मध्येच नाहीत तर भारताच्या अनेक भागांमध्ये आहेत. याशिवाय याच्या संपत्तीची गणना पूर्ण होत नाही तर तो पॉपकॉर्न एंटरटेनमेंट नावाने एक प्रोडक्शन हाउस देखील चालवतो. इतकेच नाही तर त्याचे स्वतःचे बुटिक देखील आहे ज्यामधून त्याला तगडी कमाई होते. सुनील शेट्टी वर्षभरामध्ये कोणताही चित्रपट न करता १०० करोड रुपये कमावतो. सुनील शेट्टी भलेहि आता चित्रपटांमुळे चर्चेमध्ये राहत नाही पण आपल्या बिजनेसमुळे तो खूपच चर्चेमध्ये असतो. प्रत्येकाला सुनील शेट्टी सारखे बिजनेसमॅन बनण्याची इच्छा आहे, ज्याचा बिजनेस सुनील शेट्टी सारखा प्रत्येक वर्षी यशाची शिडी चढत राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने