बॉलीवूड अभिनेता सोनू सूद सध्या रियल हिरो म्हणून समोर आला आहे. तो हिरो जो नेहमीच कोणाच्याही मदतीसाठी तयार असतो. ज्याला लोकांचे दु:ख बघवत नाही. त्याला ज्यावेळी समजते कि त्याची एखाद्या गरजवंताला गरज आहे त्यावेळी तो लगेच त्याच्यापर्यंत पोहोचतो. सोनू सूदने लॉकडाउनमध्ये स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम केले आणि अनेकांचे आशीर्वाद घेतले. अजून देखील त्याच्या मदतीचा ओघ सुरूच आहे. सोनू सूदने आता एका गरीब शेतकऱ्याची मदत केली आहे, ज्याच्याकडे बैल नसल्यामुळे त्याला आपल्या मुलींना नांगराला जुपावे लागले.
सोनू सूदने गरीब शेतकरी नागेश्वर रावसाठी एक नवीन ट्रॅक्टर पाठविला आहे. आंध्रप्रदेशचे एक गाव चित्तूरमध्ये राहणाऱ्या या शेतकऱ्याच्या घरी ट्रॅक्टर डिलीवरी झाली आहे. नागेश्वर रावने सोनू सूदकडून हि अनोखी भेट मिळाल्यानंतर त्याचे खूपच कौतुक केले आहे. नागेश्वरने हे देखील म्हंटले कि सोनू सूद आमच्यासाठी एक हिरो आहे. मी आणि माझे कुटुंब सोनू सूदच्या या मदतीसाठी त्याचे आभार मानतो असे देखील यावेळी त्यांनी म्हंटले.
शेतकरी नागेश्वरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूपच व्हायरल झाले आहे. व्हिडिओमध्ये नागेश्वर राव शेतामध्ये आपल्या मुलींकडून नागरणी करून घेताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे कि बैल खरेदी करण्यासाठी किंवा भाड्याने घेण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाहीत. मुलींना अशाप्रकारे नांगरताना पाहून सोशल मिडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सोनू सूदपर्यंत पोहोचला आणि त्याने पाहताच या कुटुंबाची मदत करण्याची घोषणा केली. सर्वात मोठी गोष्ट हि आहे कि नागेश्वरजवळ ट्रॅक्टर पोहोचला देखील आहे.
अनेक लोकांची मदत केली आहे सोनू सूदने
सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून अनेक लोकांची मदत करताना पाहायला मिळत आहे. प्रवासी मजूर, विद्यार्थ्यांपासून ते गरीब शेतकऱ्यांपर्यंत त्याने अनेकांची मदत केली आहे. काही काळापूर्वी सोनूने दशरथ मांझीच्या कुटुंबाला देखील आर्थिक मदत करण्याची गोष्ट म्हंटली होती. सोनू सूद विदेशामध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना परत करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे म्हंटले जात आहे कि सोनू सूद आपल्या या अनुभवावर एक पुस्तक देखील लिहिणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा