बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला एक महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे. पण असे असून देखील संपूर्ण देश त्याच्या आठवणीमधून सावरू शकलेला नाही. चाहत्यांपासून सेलेब्सपर्यंत सर्व दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या अकाली निधनामुळे धक्क्यामध्ये आहेत. यादरम्यान चित्रपट निर्माता शेखर कपूरला पुन्हा एकदा सुशांतची आठवण आली.

शेखरला आली सुशांतची आठवण

खरे तर शेखर कपूरने ट्वीट करून सांगितले आहे कि त्यांना अशा आहे कि एक दिवस त्यांचा महत्वकांक्षी पानी चित्रपट नक्कीच बनणार. त्यांनी सांगितले कि जर असे झाले तर हा संपूर्ण प्रोजेक्ट मी सुशांत सिंह राजपूतला समर्पित करेन. सुशांत सिंह राजपूत याआधी शेखर कपूरच्या पानी चित्रपटामध्ये पाहायला मिळणार होता, पण काही कारणांमुळे असे झाले नाही.

शेखर कपूरने केले ट्वीट

शेखर कपूरने ट्वीट करताना लिहिले आहे कि, जर तुम्ही देवी देवता किंवा आपल्या रचनात्मकतेसोबत प्रवास करू इच्छिता, तर तुम्हाला भक्तीमध्ये प्रत्येक चरणामध्ये चालावे लागेल. विनम्रतेने. देवाच्या आशीर्वादाने पानी पुन्हा एकदा नक्कीच बनेल. जर हा चित्रपट बनलात तर तो चित्रपट सुशांतला समर्पित केला जाईल. या चित्रपटामध्ये भाग घेणारे लोक माणुसकीने चालणारे लोक असतील, अहंकारावर नाही.

डि प्रे श नचा शिकार होता सुशांत

३४ वर्षीय सुशांतने मुंबई येथील बांद्रा स्थित आपल्या राहत्या घरामध्ये १४ जून रोजी ग ळ फा सघेऊन आ त्म ह त्याकेली होती. सुशांत डि प्रे श नचा शिकार होता, ज्याचा उपचार सुरु होता. टीव्ही पासून बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणाऱ्या सुशांतने शुद्ध देसी रोमांस, राबता, छिछोरे, केदारनाथ आणि सोनचिड़िया सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ठ अभिनयाचे प्रदर्शन केले होते. त्याचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा २४ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने