सुशांत सिंह राजपूतच्या आ त्म ह त्या प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी जवळ जवळ ३० लोकांची चौकशी केली आहे. नुकतेच चित्रपट निर्माता संजय लीला भंसाळीच्या चौकशीनंतर शेखर कपूरने ईमेल द्वारे पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. या ईमेलद्वारे शेखर कपूरने सांगितले आहे कि पानी हा चित्रपट शेवटी बंद का करावा लागला आणि अचानक सुशांतला चांगले चित्रपट मिळायचे बंद का झाले.

शेखर कपूरने खुलासा करताना सांगितले आहे कि पानी चित्रपट त्याचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि या चित्रपटावर त्यांनी १० वर्षे काम केले होते. पण काही कारणांमुळे या चित्रपटावर ते पुढे काम करू शकले नाहीत.

शेखरच्या म्हणण्यानुसार जवळ जवळ १५० करोड रुपये बजटमध्ये हा चित्रपट बनणार होता आणि यासाठी त्यांनी पहिल्यांदा आदित्य चोपडासोबत २०१२-१३ मध्ये भेट घेतली होती. या भेटीनंतर दोघांनी या प्रोजेक्टला २०१४ मध्ये सुरु करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर प्री-प्रोडक्शन मध्ये ७ करोड रुपये खर्च केल्यानंतर दोघांनी या चित्रपटासाठी सुशांतचे नाव देखील फाईनल केले होते.

शेखर कपूरच्या म्हणण्यानुसार या चित्रपटामध्ये सुशांत गोरा नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारणार होता. इतकेच नाही तर चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताच सुशांतने लगेच या व्यक्तीची भूमिका साकारण्यासाठी होकार दिला होता.

या भूमिकेसाठी सुशांत खूप परिश्रम घेत होता आणि तो प्रत्येक वर्कशॉपमध्ये सामील होत होता. सुशांत या चित्रपटाच्या तयारीमध्ये इतका व्यस्त होता कि तो यशराज फिल्म्सच्या प्रत्येक प्रोडक्शन मीटिंगमध्ये उपस्थित राहू लागला होता. जेणेकरून या चित्रपटासंबंधित प्रत्येक छोटी गोष्ट चांगल्या प्रकारे समजून घेण्यात मदत होईल.

शेखर कपूरनुसार नंतर क्रिएटिव डिफरंसमुळे आदित्य चोपडाने या चित्रपटामधून काढता पाय घेतला. वास्तविक शेखर कपूर जिथे या चित्रपटामध्ये कोणताही बदलाव करू इच्छित नव्हता तर आदित्य चोपडाला चित्रपटाच्या स्टोरीमध्ये काही बदल करण्यावर ठाम होता. शेखर त्याचे ऐकून घेण्यास अजिबाद तयार नव्हता आणि पानी चित्रपट सुरु होण्यापूर्वीच अडकला.

शेखरच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट बंद झाल्यानंतर सुशांत राजपूत खूपच अस्वस्थ राहू लागला होता. अनेक वेळा तो फोनवर तासनतास रडत असायचा. इतकेच नाही तर तो मला भेटल्यानंतर माझ्या खांद्यावर डोके ठेऊन खूप वेळ रडत असायचा.

यशराज फिल्मसोबत जमले नाही तेव्हा शेखर कपूरने अनेक दुसऱ्या प्रोड्यूसर्सशी संपर्क साधला. पण कुठेच सफलता मिळाली नाही आणि त्यानंतर तो लंडनला निघून गेला.

लंडनहून परत आल्यानंतर जेव्हा शेखर कपूर सुशांतला भेटला तेव्हा त्याने सांगितले कि त्याने यशराज फिल्म सोबत सर्व कॉन्ट्रैक्ट तोडले आहेत. त्याचबरोबर सुशांतने हे देखील सांगितले कि फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता त्याच्यासोबत वाईट वागणूक केली जात आहे आणि त्याला चांगले चित्रपट मिळू दिले जात नाहीत. तथापि मी त्याला सांगितले कि तू फक्त काम करत रहा आणि चांगल्या स्क्रिप्टवर लक्ष दे.

शेखर कपूरच्या पानी चित्रपटासाठी सुशांतने बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला : रामलीला, आणि पद्मावत सहित १० चित्रपट रिजेक्ट केले होते. अशामध्ये आज देखील लोकांच्या मनामध्ये हे प्रश्न येतात कि पानी चित्रपट का बनला नाही.?

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने