सुशांत सिंह राजपूत आणि संजना सांघी अभिनित दिल बेचारा चित्रपट २४ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला दर्शकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. चाहते पडद्यावर सुशांतचा शेवटचा अभिनय पाहून भावूक होत आहे. चित्रपटाचा डिजिटल प्रीमियर झाल्यानंतर सारा अली खानने सुशांतचा पापा सैफ अली खानसोबत एक फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. सोशल मिडियावर हा फोटो शेयर करण्यासोबत अभिनेत्रीने भावनिक पोस्ट लिहिली.

दिल बेचारा मध्ये सैफने केली आहे भूमिका

केदारनाथ चित्रपटामधून सुशांत सिंह राजपूतसोबत बॉलीवूड मध्ये डेब्यू करणारी सारा अली खानचे वडील सैफ अली खानने देखील दिल बेचारा चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे. तथापि सैफची भूमिका इतकी मोठी नाही पण तरीही त्याची भूमिका महत्वाची आहे.

साराने सैफ आणि सुशांत सिंह राजपूतचा फोटो शेयर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, फक्त दोन जंटलमॅन ज्यांनी व्हॅन घोष, टेलीस्कोप, प्लेनेटेरियम, गिटार, नॉर्दर्न लाइट्स, क्रिकेट, पिंक फ्लॉयड, नुसरत साब आणि अॅक्टिंग टेक्नीक्सबद्दल माझ्यासोबत बातचीत केली. तुम्हा दोघांमध्ये एकच गोष्ट कॉमन होती. दिल बेचारा आता डिस्ने प्लस हॉटस्टारवर.

अशी आहे चित्रपटाची स्टोरी

सुशांत सिंह राजपूतने १४ रोजी मुंबई स्थित आपल्या राहत्या घरामध्ये ग ळ फा सघेऊन आ त्म ह त्याकेली होती. दिल बेचारा त्याचा शेवटचा चित्रपट आहे, ज्यामध्ये त्याने अभिनेत्री संजना सांघीसोबत भूमिका साकारली आहे. २४ जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपट खूपच इमोशनल आहे, याला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. चित्रपटाची स्टोरी एका अशा मुला आणि मुलीबद्दल आहे जे शारीरिक व्याधींशी सामना करत आहे आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने