बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट २४ जुलैला डिज़्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे, ज्याला खूपच कमी वेळामध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यादरम्यान चाहते चित्रपटामधील मुख्य अभिनेत्री संजना सांघीच्या अभिनयाचे देखील कौतुक करत आहेत. दिल बेचारा चित्रपटामध्ये भलेहि संजना सांघी मुख्य भूमिका साकारत आहे पण या चित्रपटाच्या अगोदर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

रॉकस्टार

संजना सांघी सध्या आपल्या आगामी दिल बेचारा चित्रपटामुळे खूपच चर्चेमध्ये आहे. पण खूपच कमी लोकांना माहिती आहे कि या अभिनेत्रीचा डेब्यू चित्रपट रॉकस्टार होता. रणबीर कपूर आणि नरगिस फखरी अभिनित या चित्रपटामध्ये दर्शकांचे लक्ष खेचून घेण्यात संजना अपयशी ठरली. या चित्रपटामध्ये तिने नरगिस फखरीच्या बहिणीची भूमिका साकारली होती.

हिंदी मीडियम

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियम चित्रपटामध्ये देखील संजनाने काम केले होते. तिने या चित्रपटामध्ये सबा कमरच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये दिवंगत अभिनेता इरफान खान मुख्य भूमिकेमध्ये होता.

फुकरे रिटर्न्स

फुकरे रिटर्न्स चित्रपटामध्ये देखील संजना सांघीने काम केले आहे. या चित्रपटामध्ये तिने केटीची भूमिका साकारली होती. तथापि अभिनेत्री संजना सांघी आपल्या आगामी दिल बेचारा चित्रपटामुळे सध्या खूपच चर्चेमध्ये आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने