कोरोनाची दहशत कमी नाही झाली. हजारो लोक या व्हायरसचा शिकार होत आहेत. भारतामध्ये देखील या व्हायरसची दहशत कमी नाही झाली. अनेक लोक या व्हायरसच्या तावडीत सापडले आहेत. तसे देशामध्ये लोकांच्या सोय लक्षात घेऊन लॉकडाउन हटविण्यात आले आहे आणि अनलॉक २ मध्ये लोकांना अधिक सुविधा देण्यात येऊ लागल्या आहेत.

तथापि सामान्य लोकांसारखे बॉलीवूड सेलेब्सही गरज असेल तर घराबाहेर पडत आहेत. अशामध्ये सेलेब्ससंबंधित अनेक किस्से, स्टोरीज, फोटोज आणि व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंह बद्दल एक किस्सा चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. हा किस्सा तिची मुलगी सारा अली खानने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखती दरम्यान शेयर केला होता. तिने जे सांगितले ते ऐकून सर्वजण हैराण राहिले होते.

लॉकडाऊन दरम्यान सारा पूर्ण काळ घरीच राहिली होती. तिने आई अमृता आणि भाऊ इब्राहिम सोबत पूर्ण वेळ व्यतीत केला. आतापर्यंत फक्त तीन चित्रपटांमध्ये पाहायला मिळालेली साराने काही महिन्यांपूर्वी एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये तिने आईबद्दल बातचीत केली होती.

मुलाखती दरम्यान साराने आई अमृताबद्दल एक मजेदार गोष्ट सांगितली. तिने आपल्या आईच्या बोर्ड परीक्षेचा किस्सा सांगितला. साराने सांगितले होते कि आईने आपल्या १०वी बोर्डमध्ये उत्तरपत्रिकेवर लव अमृता सिंह लिहिले होते आणि परीक्षा हॉलमधून बाहेर आली होती. साराने म्हंटले कि तुम्ही स्वतःच विचार करा कि तिला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर न देता किती मार्क्स मिळाले असतील.

साराच्या पॅरेंट्सची पहिली भेट ये दिल्लगी चित्रपटाच्या सेटवर झाली होती. दोघे एका फोटोशूटसंबंधी भेटले होते. अमृताच्या म्हणण्यानुसार फोटोशूट दरम्यान जेव्हा सैफने अमृताच्या खांद्यावर हाथ ठेवला तेव्हा तिने सैफला वळून पाहिले, कारण त्यावेळी सैफ बॉलीवूडमध्ये नवीन होता आणि अमृता त्याच्यापेक्षा खूपच सिनियर होती.

३ महिन्याच्या डेटनंतर सैफ आणि अमृताने १९९१ मध्ये लपून सिक्रेट वेडिंग केले होते, कारण दोघेही कुटुंबीयांच्या रिअॅक्शनला घाबरले होते. याचे कारण होते सैफ आणि अमृतामधील वयाचे अंतर. अमृता सैफपेक्षा जवळ जवळ १३ वर्षाने मोठी होती. दोघांच्या नुसार त्यांनी लग्नाच्या २ दिवसांआधी हा निर्णय घेतला होता कि आता त्यांना आयुष्यभर एकत्र राहायचे आहे.

सैफ आणि अमृताचे सारा आणि इब्राहिम नावाची दोन मुले आहेत. अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफने ३ वर्षांपर्यंत स्विस मॉडल रोसा कैटलानोला डेट केले होते होते पण हि रिलेशनशिप जास्त काळ टिकू शकली नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले.

सैफने १० वर्षाने लहान करीनासोबत १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये लग्न केले होते. करीनाच्या अगोदर सैफने आपल्यापेक्षा १३ वर्षाने मोठ्या अमृता सिंह सोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न १९९१ मध्ये झाले होते. १३ वर्षे एकत्र राहिल्यानंतर २००४ मध्ये दोघे वेगळे झाले होते.

अमृतासोबत लग्न केल्यानंतर १३ वर्षांनी सैफने तिच्यासोबत घटस्फोट घेतला. एका मुलाखतीमध्ये सैफने सांगितले होते कि, घटस्फोटादरम्यान ५ करोड रुपयेची एलिमनी निश्चित केली गेली होती, ज्यामध्ये २.५ करोड रुपये त्याने दिले होते. त्याचबरोबर तो मुलांच्या देखभालीसाठी दर महिन्याला एक लाख रुपये अमृताला देत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने