सुशांत सिंह राजपूत सु सा ईड केसमध्ये आता मुंबई पोलिसांच्या सोबत बिहार पोलीस देखील तपास करू लागले आहेत. सुशांतचे वडील केके सिंह द्वारा रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांविरुद्ध दाखल केलेल्या एफआईआर नंतर या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. गुरुवारी बिहार पोलिसांनी मुंबई येथील बांद्रामध्ये सुशांतच्या सर्व बँक खात्यांची तपासणी केली. आता या बँक स्टेटमेंट्सवरून असे समजते कि सुशांत केवळ गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच नाही तर तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसाठी देखील खर्च करत होता.

एका अहवालानुसार सुशांतने ऑक्टोबर २०१९ मध्ये रिया आणि शौविकच्या फ्लाइट तिकीटसाठी पैसे दिले होते. फ्लाइट तिकीटसाठी सुशांतच्या खात्यामधून ८१००० रुपये काढले गेले होते. इतकेच नाही रिपोर्टमध्ये हे देखील समोर आले आहे कि सुशांतच्या खात्यामधून रियाच्या दोन अन्य फॅमिली मेंबर्ससाठी देखील पैसे देण्यात आले आहेत.

प्रवास खर्चाशिवाय सुशांतने मुंबईच्या ताज लँड्स अँड हॉटेलमध्ये शौविक थांबला होता आणि त्यासाठी त्याने पेमेंट केले होते. शौविकचे बिल ४,७२,९७५ रुपये इतके आले होते आणि हे सुशांतच्या अकाऊंटमधून देण्यात आले होते असा अकाउंट स्टेटमेंटमध्येही उल्लेख आहे. रिपोर्ट्समध्ये हे देखील सांगितले जात आहे कि सुशांतने शौविकच्या शिक्षणासाठी देखील पैसे दिले होते. शौविकच्या फ्लाइट तिकीट आणि हॉटेलमध्ये राहण्याव्यतिरिक्त सुशांत शौविकच्या शिक्षणासाठी आणि ट्यूशनसाठी फीस देखील देत होता. बँकेच्या स्टेटमेंट मधून हि माहिती समोर आली आहे.

रियाच्या वैयक्तिक खर्चामध्ये झारा ब्रँडच्या खरेदीपासून हेयर स्टाइलिस्ट आणि मेकअपचे देयक देखील सामील होते. रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे कि रियाने झारा ब्रँडमध्ये खरेदीसाठी सुशांतच्या पर्सनल अकाउंट मधून ३५००० रुपये काढले होते. यासोबत आणखीन एक जवळच मित्र सैमुअल देखील सुशांतच्या खात्यामधून ५ लाख रुपये वापरण्यावरून प्रश्नांच्या घेऱ्यामध्ये आला आहे.

सुशांतच्या खात्यामधून रियाने वैयक्तिक खर्चासाठी देखील मोठा व्यवहार केला आहे. खात्यामधून ब्यूटी पार्लरमध्ये तिच्या मेकअप आणि हेयरस्टाइलसाठी ४०००० रुपये काढले गेले होते. रियाने आपल्या पर्सनल खर्चांसाठी त्याच्या खात्यामधून एकूण १ लाख रुपये काढले होते. कागदपत्रांवरुन समोर आले आहे कि नोवेंबर २०१९ मध्ये सुशांतच्या खात्यामध्ये ४ करोड रुपयांपेक्षा जास्त रक्कम शिल्लक होती. तथापि फेब्रुवारी २०२० पर्यंत हि रक्कम १ करोड रुपये पेक्षा देखील कमी झाली.

बिहार पोलीस सध्या सुशांतच्या कुटुंबियांद्वारे रियाच्या विरुद्ध आरोप लावल्यानंतर सुशांतच्या बँक खात्यांचा तपशील तपासत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार प्रवर्तन निदेशालय (ईडी) संभावित धन शोधन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी रिया चक्रवर्ती आणि इतरांच्या विरुद्ध दाखल केलेली एफआयआरची प्रत मागितली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने