बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री जगातील खूप मोठी फिल्म इंडस्ट्री म्हणून ओळखली जाते. तसे पाहायला गेले तर बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवनवीन चेहरे पाहायला मिळतात पण ते चेहरे जास्त सफल होत नाही आणि जे चेहरे सफल होतात त्यांच्याजवळ करोडोंची संपत्ती येते. ज्यामुळे ते जास्त धनवान बनतात. बॉलीवूड इंडस्ट्रीसोबत साउथ इंडस्ट्रीमध्ये देखील एकापेक्षा एक प्रसिद्ध अभिनेते आहेत. सध्या साउथ फिल्म इंडस्ट्री देखील चांगलीच लोकप्रिय आहे. या कलाकारांची लोकप्रियता बॉलीवूड अभिनेत्यांपेक्षा काही कमी नाही.

१. विजय

आपल्या सर्वांना तर विजय बद्दल माहितीच असेल जो साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्याने आतापर्यंत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत ज्यामुळे विजय खूपच लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक ओळखला जातो. विजयला साउथमध्ये थलापति म्हणून देखील ओळखले जाते. विजयने आतापर्यंत ६० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजय २०० करोड रुपये संपत्ती मालक आहे.

२. महेश बाबू

असे होऊच शकत नाही कि तुम्ही महेश बाबूला ओळखत नसाल. महेश बाबू साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तेलगु सुपरस्टार महेश बाबू साऊथच्या चित्रपटांमध्ये लहानपणापासून काम करत आहे. महेश बाबूने आतापर्यंत २५ चित्रपट केले आहेत. महेश बाबूची एकूण संपत्ती १३५ करोड रुपये इतकी आहे.

३. जूनियर एनटीआर

जूनियर एनटीआरला जबरदस्त लुकमुळे ओळखले जाते आणि त्याने देखील अनेक मोठमोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. साउथ चित्रपटांमध्ये अॅक्शन हिरो एनटीआरच्या अनेक पिढ्या राज्य करत आहेत. जूनियर एनटीआरजवळ जवळ जवळ ३८३ करोड रुपये इतकी संपत्ती आहे.

४. चिरंजीवी

चिरंजीवीने आतापर्यंत १५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. चिरंजीवी साउथच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. चिरंजीवीजवळ १५०० करोड रुपये इतकी संपत्ती आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने