सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेची जोडी भलेहि झाली नसेल, पण यांच्यामधील बॉन्डिंगला विसरणे प्रत्येकाला शक्य नाही. सुशांत सिंह राजपूतच्या जाण्यानंतर अंकिता आणि सुशांतच्या नात्यासंबंधी अनेक प्रकारच्या बातम्या ऐकायला मिळाल्या आहेत.

२०१६ मध्ये सुशांत आणि अंकिताची जोडी जी एकमेकांपासून वेगळी झाली, प्रत्येकाच्या मनामध्ये एक खल कायमची राहिली. जर हे दोघे एकमेकांच्यासोबत कायमचे एकत्र राहिले असते. २०१६ मध्ये अंकिता आणि सुशांत लग्न करणार होते आणि लग्नासाठी अंकिताने अनेक स्वप्ने रंगवली होती. त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत.

अंकिताला नेहमी वाटायचे कि सुशांत खूपच लाजाळू स्वभावाचा आहे, पण झलक दिखला जा च्या स्टेजवर जेव्हा अंकिताला लग्नासाठी सुशांतने प्रपोज केले होते तेव्हा तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. अंकिताची इच्छा होती कि तिला आयुष्यभर सुशांतची साथ मिळावी. अंकिताची इच्छा होती कि तिचा होणारा पती घोड्यावर बसून नाही तर हत्तीवर बसून यावा.

याबद्दल बोलताना तिने स्वतः एका मुलाखतीमध्ये म्हंटले होते कि, अंकिताच्या आजोबांचे लग्न असेच झाले होते तेव्हा अंकिताची देखील इच्छा होती कि तिचा पती हत्तीवर बसून यावा. अंकिता आणि सुशांतच्या लग्नाच्या बातम्या २०१४ मध्ये ऐकण्यात आल्या होत्या. पण कोणत्याना कोणत्या कारणामुळे दोघेही लग्नाला टाळत होते.

२०१६ मध्ये अंकिताने सुशांतला अल्टीमेटम दिला आणि म्हंटले कि यावर्षाच्या शेवटपर्यंत लग्न करायचे आहे. यावर प्रतिक्रिया देताना सुशांतने म्हंटले कि माझ्याजवळ आता कोणतीही चॉइस नाही. जर मी अंकितासोबत डिसेंबर महिन्यामध्ये लग्न केले नाही तर ती देखील पुन्हा लग्न करणार नाही.

अंकिता लोखंडेला सजण्या सवरण्याची खूप आवड होती, यामुळे राजस्थानी स्टाइलमध्ये तिला लग्न करायचे होते. लग्नाच्या अगोदर दोघांनी मोठे घर घेण्याची देखील योजना बनवली होती. आपले एक वेगळे जग बनवण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या १ महिन्यानंतर पहिल्यांदा सोशल मिडियाच्या माध्यमातून अंकिताने पोस्ट शेयर केली आहे. तिने एका दिव्याचा फोटो शेयर केला आहे आणि पोस्ट शेयर करताना लिहिले आहे कि देवाचा सर्वात गोड मुलगा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने