काश्मीरचा प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरसारखा हुबेहूब दिसणाऱ्या जुनैद शाहचे निधन झाले आहे. हुबेहूब रणबीरसारखे दिसत असल्यामुळे तो नेहमी चर्चेमध्ये राहत होता. त्याच्या मृत्यूची बातमी काश्मीरच्या एका पत्रकार युसुफ जुनैदने दिली आहे. त्याने सांगितले कि कार्डियक अरेस्टमुळे श्रीनगर येथील इलाही बाग येथील त्याच्या राहत्या घरी त्याचे निधन झाले.

युसूफ जुनैद काश्मीर येथील प्रसिद्ध पत्रकार आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हि बातमी शेयर केली आहे. त्यांनी लिहिले कि रात्री उशिरा आमचा शेजारी निसार अहमद शाहचा मुलगा जुनैद शाह कार्डिएक अरेस्टमुळे या जगातून निघून गेला आहे. लोक त्याला बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सारखा दिसत असल्यामुळे खूप ओळखत होते.

जुनैद शाह रणबीर कपूरसारखा दिसत असल्यामुळे खूपच लोकप्रिय होता. यामुळे त्याचे चाहते देखील खूप होते. तो नेहमी बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरसारखा पेहराव आणि हेयर स्टाइल फॉलो करताना पाहायला मिळत होता. ऋषी कपूरने देखील एकदा जुनैद आणि रणबीर कपूरचा एकत्र फोटो शेयर केला होता आणि त्याचे खूपच कौतुक केले होते.

२०१५ मध्ये त्यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर रणबीर आणि जुनैदचा एक कोलाज फोटो शेयर केला होता आणि लिहिले होते कि, हे देवा माझ्या मुलासारखा दिसणारा आहे, विश्वास होत नाही. हा एक छान हुबेहूब दिसणारा आहे.

२००७ मध्ये जेव्हा रणबीरचा पहिला चित्रपट सावरिया आला होता तेव्हा जुनैद कॉलेजमध्ये होता, या चित्रपटानंतर लोक त्याला हुबेहूब रणबीरसारखा दिसणारा म्हणून बोलावू लागले. जुनैदने कश्मीर यूनिवर्सिटीमधून एमबीए केले होते. यानंतर तो मॉडेलिंग देखील करू लागला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने