बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्नाची आज ८ वी डेथ एनिवर्सरी आहे. काका नावाने प्रसिद्ध झालेले अभिनेता राजेश खन्ना पंजाबच्या अमृतसरमध्ये जन्मले होते. त्यांनी ६० च्या दशकामध्ये आलेल्या आखिरी खत चित्रपटामधून आपल्या करियरची सुरुवात केली होती. तथापि त्यांना आराधना चित्रपटामधून सफलता मिळाली जो १९६९ मध्ये आला होता. या चित्रपटामध्ये त्यांच्यासोबत शर्मिला टैगोर होती. यानंतर तर राजेश खन्नाने बॉलीवूडमध्ये अमाप प्रसिद्धी मिळवली. तसे म्हंटले जाते कि राजेश खन्नाच्या या स्टारडमच्या मागे जुबली स्टार राजेंद्र कुमारचा खूप मोठा हात होता.

वास्तविक हि गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा राजेश खन्नाने काही चित्रपटांमध्येच काम केले होते, पण त्यांना खास सफलता मिळाली नव्हती. यादरम्यान राजेश खन्नाची नजर राजेंद्र कुमार यांच्या बंगल्यावर पडली. खरेतर राजेंद्र कुमार त्यावेळचे जुबली स्टार म्हणून ओळखले जात होते. असे म्हंटले जते कि ते ज्या चित्रपटामध्ये काम करत होते तो चित्रपट हिट होत होता.

त्यावेळच्या फिल्मी कॉरिडोरमध्ये एक चर्चा होती कि राजेंद्र कुमारच्या या स्टारडममागे तो बंगला आहे ज्यामध्ये ते राहत होते. पण लोक त्या बंगल्याला भूतबंगला आणि अशुभ समजत होते. इतकेच नाही तर राजेंद्र कुमारला देखील तो बंगला घेण्यासाठी लोकांनी मनाई केली होती, पण त्यांनी नाही मानले आणि तो बंगला खरेदी केला.

हा बंगला खरेदी केल्यानंतरच राजेंद्र कुमारचा स्टारडम शिखरावर होता. जेव्हा राजेश खन्नापर्यंत हि गोष्ट पोहोचली तेव्हा त्यांनी विचार केला कि जर राजेंद्र कुमार आपला बंगला कशाहीप्रकारे विकू शकले तर त्यांचे दिवस देखील बदलून जातील आणि ते देखील पाहता पाहता सुपरस्टार बनले असते.

तथापि काळानुसार राजेंद्र कुमारच्या करियरला देखील उतरती कळा लागली आणि एक काळ असा देखील आला जेव्हा त्यांचे चित्रपट काही खास चालत नव्हते. अशामध्ये राजेंद्र कुमारला सपोर्टिंग रोल देखील करावे लागले. इतकेच नाही तर हालत अशी झाली कि राजेंद्र कुमारला आपला तो लकी बंगला विकावा लागला आणि त्याला ७० च्या दशकामध्ये शेवटी राजेश खन्ना यांनी खरेदी केले.

हा बंगला खरेदी केल्यानंतर तर राजेश खन्ना यांचे दिवस परत आले. त्यांनी आपल्या बंगल्याचे नाव आशीर्वाद ठेवले. हा बंगला मुंबईच्या कार्टर रोडवर होता. हा बंगला खरेदी केल्यानंतर राजेश खन्नाचे प्रत्येक चित्रपट हिट होऊ लागले.

यानंतर ते असे स्टार बनले ज्यांचे सलग १७ चित्रपट हिट झाले जो एक रेकॉर्ड आहे. तथापि नंतर राजेश खन्ना यांचा आइकॉनिक बंगला आशीर्वादला शशिकिरण शेट्टीने जवळ जवळ ९० करोड रुपये मध्ये खरेदी केले होते. यानंतर याला पाडून इथे ४ मजली रेसिडेंशियल बिल्डिंग बनवली गेली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने