बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून रोजी मुंबई बांद्रा येथील आपल्या राहत्या घरी मृ त अवस्थेत आढळला होता. ज्यानंतर पोलीस सतत या प्रकरणामध्ये तपास करत आहेत. या प्रकरणाबद्दल सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, सुशांतचे मॅनेजर सिद्धार्थ पीठानी, संजय लीला भंसाळी, आदित्य चोपड़ा आणि शेखर कपूर सारख्या अनेक मोठ्या असामींची चौकशी केली गेली आहे. एकीकडे जिथे सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये नेपोटिज्मचा मुद्दा उफाळला आहे तर दुसरीकडे सोशल मिडियावर अनेक कलाकार देखील सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये पोलीस प्रत्येक अँगलने तपास करत आहेत. त्याअंतर्गत आता राजीव मसंदचा जबाब नोंदवला जात आहे. तर मुंबई पोलीस देखील या प्रकरणामध्ये वेगाने तपास करत आहेत. बातमीनुसार राजीव ससंदने सुशांतसंबंधी अनेक निगेटिव आर्टिकल लिहिले होते. त्याचबरोबर सुशांतच्या चित्रपटांना देखील निगेटिव रेटिंग दिली होती.

राजीवचे बांद्रा पोलीस स्टेशन येथे पोहोचल्याचे काही फोटो एका न्यूज वेबसाईटने जारी केले आहेत. राजीव मसंदवर असा आरोप आहे कि त्याने जाणूनबुजून सुशांतच्या चित्रपटांना निगेटिव रेटिंग दिली होती. असे म्हंटले जाते कि राजीवने काही लोकांच्या सांगण्यावरून सुशांतच्या चित्रपटांना निगेटिव रेटिंग दिली होती.

अशामध्ये आता चित्रपट समीक्षक राजीव मसंदला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. प्रसिद्ध चित्रपट समीक्षक राजीव मसंदला मुंबई पोलिसांनी बांद्रा पोलीस स्टेशन येथे चौकशी साठी बोलावले आहे. या संदर्भामध्ये पोलिसांनी चौकशीसाठी राजीव मसंदला बोलावले आहे.

त्याची चौकशी केल्यानंतर हे स्पष्ट केले जाईल कि हे सर्व आरोप किती खरे आहेत आणि किती चुकीचे आहेत. तर सुशांतच्या प्रकरणामध्ये राजीवशिवाय देखील अनेक नामवंत व्यक्तींची चौकशी केली गेली आहे. तथापि पोलीस अजून कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकलेले नाहीत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने