कोरोनाच्या युद्धामध्ये बॉलीवूड अभिनेता सोनू सूद खूपच चर्चेमध्ये राहिला होता. त्याने कोरोनाच्या काळामध्ये दुसऱ्या शहरांमध्ये फसलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचविण्याचे काम केले होते. इतकेच नाही तर त्याने मजुरांसाठी स्पेशल ट्रेन देखील चालवल्या होत्या. यानंतर लोकांनी त्याला देवाचा दर्जा दिला होता. यामधील एका प्रवास्याने सोनू सूद प्रती आभार व्यक्त केला आहे.

वास्तविक उडीसा येथील केंद्रपाडा येथे राहणाऱ्या प्रशांतने आता एक वेल्डिंग वर्कशॉप सुरु केले आहे आणि याचे नाव त्याने सोनू सूद वेल्डिंग शॉप असे ठेवले आहे. प्रशांत कोच्ची एयरपोर्टजवळ एका कंपनीमध्ये प्लंबरचे काम करत होता. लॉकडाउन दरम्यान प्रशांत बेरोजगार झाला होता. त्याच्याजवळ श्रमिक स्पेशल ट्रेनसाठी तिकीट घेण्यापुरते देखील पैसे नव्हते. सोनू सूदने त्याची मदत केली आणि तो २९ मे रोजी स्पेशल फ्लाईट द्वारे केरळ पासून आपल्या घरी उडीसाला पोहोचला.

सोनू सूदनुसार प्रशांतने घरी पोहोचल्यानंतर त्याचे नाव आणि त्याचा फोटो वापरण्याची परमिशन मागितली होती. सोनू सूदने याची परमिशन दिली होती. त्याने यावर म्हंटले होते कि मी अनेक ब्रँड्सच्या जाहिराती केल्या पण हे तर माझ्या हृदयाच्या जवळ असेल. सोनूने म्हंटले कि जेव्हा कधी मी उडीसाला जाईन तेव्हा प्रशांतच्या दुकानात जरूर जाईन.

सोनू सूद सतत लोकांची मदत करत आहे. त्याने नुकतेच मुंबई पोलिसांना २५ हजार फेसशिल्ड डोनेट केले आहेत. याचा उल्लेख महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका ट्वीटद्वारे केला होता. याशिवाय लॉकडाउन दरम्यान मदतीच्या स्टोरींबद्दल सोनू सूद लवकरच एक पुस्तक प्रकाशित करणार आहे.

तर याआधी नुकतेच सोनू सूदने एका न्यूज एजेंसीसोबत बातचीत केली होती. ज्यामध्ये त्याने सांगितले होते कि गेले साडे तीन महिने एकाप्रकारे माझे जीवन बदलण्याचा अनुभव राहिला आहे. माइग्रेंट्ससोबत १६ ते १८ तास राहणे आणि त्यांचे दु:ख वाटून घेणे. मी जेव्हा त्यांना निरोप द्यायला जात होतो तेव्हा माझे हृदय आनंदाने भरलेले असायचे.

त्यांच्या चेहऱ्यावरील एक हास्य, त्यांच्या डोळ्यांमधील आनंदाश्रू, माझ्या लाईफमधील सर्वात स्पेशल अनुभव राहिला. मी वचन देतो कि मी तोपर्यंत काम करत राहील जोपर्यंत शेवटचा माइग्रेंट्स आपल्या घरी आणि प्रियजनांकडे पोहोचत नाही.

सोनू सूदने पुढे म्हंटले, मला विश्वास आहे कि मी यासाठीच शहरात आलो होतो, हेच माझे ध्येय होते. मी देवाचे आभार मानू इच्छितो त्याने प्रवास्यांच्या मदतीसाठी मला साधन बनवले. मुंबई माझ्या हृदयाची धडधड आहे, पण आता मला वाटते कि माझा एक हिस्सा, यूपी, बिहार, झारखंड, असाम, उत्तराखंड आणि इतर अन्य राज्यांच्या गावांमध्ये देखील राहतो.

जिथे मला आता नवीन दोस्त मिळाले आहेत आणि सखोल संबंध बनले आहेत. मी निर्णय घेतला आहे कि या सर्व अनुभवांना आणि स्टोरींना एका पुस्तकामध्ये कैद करणार आहे. सोनूने म्हंटले कि पुस्तकाला पेंग्विन प्रकाशित करणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने