साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये रजनीकांत नंतर अभिनेता चिरंजीवी सर्वात लोकप्रिय आहे. चिरंजीवीला सुपरस्टार नाही तर मेगास्टार ऑफ टॉलीवुड असे म्हंटले जाते. चिरंजीवीने आपल्या फिल्मी करियरमध्ये एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट केले आहेत. आताही ते वर्षा-दोन वर्षांमध्ये एखाद्या चित्रपटामध्ये जबरदस्त एंट्री घेत असतात. चिरंजीवीने तेलगु, तमिळ आणि कन्नड शिवाय काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
चिरंजीवी साउथच्या सर्वात श्रीमंत फिल्म स्टार्सपैकी एक आहेत. मिडिया रिपोर्ट्सनुसार चिरंजीवी जवळ जवळ १३०० करोडच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत. ज्यामध्ये हैद्राबाद येथील त्यांचा अलिशान बंगला पाहून कोणाचेही डोळे दिपतील. खूपच भव्य असलेल्या या बंगल्याचे काही फोटो आपण पाहू शकता. चिरंजीवीचा आलिशान बंगला हैद्राबाद येथील जुबली हिल्सच्या प्राइम लोकेशनवर आहे. बंगल्याची किंमत जवळ जवळ ३८ करोड इतकी सांगितली जाते.
चिरंजीवीच्या या आलिशान बंगल्याला पाहणारे म्हणतात कि घराच्या आतमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत. बंगल्यांच्या भिंतीना महागड्या पेंटिंग्जने सजवले गेले आहे. त्याचबरोबर चिरंजीवीच्या घराची बाहेरील बाजू देखील शानदार आहे. घरामध्ये असलेली हिरवळ बंगल्याला अधिकच शानदार लुक देते.
चिरंजीवीचा मुलगा राम चरण तेजा देखील साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील सुपरस्टावर आहे. तेजाने देखील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्याचे चित्रपट दर्शकांना खूप पसंत येतात. असे म्हंटले जाते कि राम चरण तेजाकडे देखील एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत १०० करोड रुपये इतकी सांगितली जाते. तथापि ६५ वर्षांचे झालेले चिरंजीवी आता चित्रपटांमध्ये जास्त अॅक्टिव नाहीत, पण ते जेव्हा कधी पडद्यावर पाहायला मिळणार तेव्हा संपूर्ण थियेटर त्यांच्या एंट्रीला ग्रँड सॅल्यूयट करते.
टिप्पणी पोस्ट करा