बॉलीवूड अभिनेत्री मलाईका अरोरा सध्या अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनमुळे खूपच चर्चेमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या या कलाकारांनी देखील आपले रिलेशन कबूल केले आहे आणि दोघे लवकरच लग्न देखील करणार आहेत, नुकतेच मलाईकाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि त्यांचे ड्रीम वेडिंग कसे असेल. चित्रपटांपासून दूर झाल्यानंतरहि मलाईका अरोराने बॉलीवूडमध्ये आपली जबरदस्त ओळख कायम ठेवली आहे.

मलाईका नुकेतच नेहा धुपियाचा शो नो फिल्टरमध्ये पोहोचली होती. तिने सांगितले कि मी प्रेग्नंसीच्यावेळी देखील काम करणे सोडले नव्हते आणि डिलिवरीच्या ४० दिवसांनंतरच कामावर जाने सुरु केले होते. याबद्दल सांगताना तिने म्हंटले होते कि मी प्रेग्नंसीच्या अगोदर देखील काम केले, त्यादरम्यान देखील काम केले आणि डिलिवरीच्या ४० दिवसांनंतरच काम करायला सुरु केले होते. मी माझ्या मुलासाठी ४० दिवसांची सुट्टी घेतली होती कारण माझी आई अशी होती कि, नाही तुला करायलाच पाहिजे. यानंतर ४० दिवसांनंतरच मी इंडस्ट्रीमध्ये शुटींग करायला सुरु केले होते.

मलाईकाने आपल्या आणि अर्जुनच्या रिलेशनबद्दल देखील खुलासा केला आणि आपल्या लग्नाबद्दल सांगितले कि माझे लग्न बीचवर होईल आणि पूर्णपणे पांढरे असेल. माझ्या लग्नामध्ये सर्व गोष्टी पांढऱ्या असतील. एली साब गाऊन परिधान करेन. नेहासोबत बोलताना मलाईकाने अर्जुनबद्दल एक गोष्ट देखील सांगितली. मलाईकाने म्हंटले कि अर्जुनला वाटते कि मला चांगले फोटो काढता येत नाहीत, तर तो माझे चांगले फोटो काढतो. मलाईकाने अर्जुनसोबतच्या रिलेशनचा सोशल मिडियावर स्वीकार केला आहे.

त्याचबरोबर अभिनेत्री मलाईकाने म्हंटले कि करियरच्या सुरुवारीच्या काळामध्ये तिला डार्क स्किन कॅटेगरीमध्ये ठेवले जात होते आणि त्यावेळी या गोष्टीबद्दल भेदभाव केला जात होता. लोक डार्क स्किन आणि फेयर स्किनमध्ये भेदभाव करत होते. मलाईका अरोराने आपल्या करियरच्या सुरुवातीला एक व्हिडिओ जॉकी म्हणून काम केले होते. यानंतर ती अनेक डांस व्हिडिओज आणि चित्रपटांमध्ये दिसली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने