बॉलीवूड फिल्मी जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरने नुकतेच इंस्टाग्रामवर पदार्पण केले आहे. इंस्टाग्रामवर डेब्यूच्या काही काळानंतर करीना कपूर खानचे अकाऊंट फक्त व्हेरीफाईडच झाले नाही तर त्याचबरोबर करीनाच्या फॉलोअर्सची संख्या खूपच वेगाने वाढू लागली आहे. याबरोबर करीनाने आपल्या अकाउंटवरुन आपला पहिला फोटो शेयर केला आहे.


करीनाच्या या इंस्टाग्राम अकाउंटला आतापर्यंत जवळ जवळ पाच लाख त्रेचाळीस हजार लोकांनी फॉलो देखील केले आहे. फॉलो करणाऱ्या कलाकारांच्या लिस्टमध्ये मनीष मल्होत्रा, आहाना कुमरा आणि तमन्ना भाटिया सारखे कलाकार देखील सामील आहेत. सोशल मिडियावर हा फोटो खूपच व्हायरल होत आहे. या फोटोला फॅन्ससोबत कलाकार देखील खूपच पसंत करू लागले आहे. फॅन्स करीनाच्या फोटोचे खूपच कौतुक करत आहेत.

करीनाचा शेवटचा चित्रपट गुड न्यूज होता ज्यामध्ये ती अभिनय करताना पाहायला मिळाली होती. चित्रपटामध्ये करीनासोबत अक्षय कुमार, कियारा आडवाणी आणि दिलजीत दोसांझ देखील मुख्य भूमिकेमध्ये होते. तर करीनाचा पुढचा चित्रपट अंग्रेजी मीडियम आहे. चित्रपटामध्ये करीनासोबत इरफान खान देखील पाहायला मिळणार आहे. तर करीना आमिर खानसोबत लाल सिंह चड्ढा मध्ये देखील पाहायला मिळणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने