अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये बरेच बदल झालेले पाहायला मिळत आहेत. नेपोटिज्मबद्दल सध्या बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये चांगलाच वाद उफाळून येत आहे. चाहत्यांपासून बॉलीवूड सेलेब्स देखील नेपोटिज्म बद्दल आपले मत व्यक्त करत आहेत. बॉलीवूडमधील काही खास लोकांना यामध्ये चांगलेच घेरले जात आहे.

नुकतेच कंगना रनौतने एका मुलाखतीमध्ये अनेक अशा गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे लोकांची आगपाखड झाली आहे. नेपोटिज्म आणि बॉलीवूड कॅम्पविरोधात लढाई लढता लढता पण तुम्हाला माहिती आहे का कि कंगना रनौतमुळे अभिनेता सोनू सूदला चित्रपट सोडवा लागला होता. कंगनाचा चित्रपट मणिकर्णिका साठी सोनू सूदने ४५ दिवस शुटींग केली होती. पण नंतर वादविवादामुळे त्याने स्वतःला या चित्रपटापासून वेगळे केले होते.

मणिकर्णिकामध्ये सोनू सूद वीर योद्धा सदाशिवची भूमिका साकारणार होता. ज्यासाठी सोनू सूदने एक सीन देखील शूट केला होता, जिथे तो युध्य लढताना दिसत आहे. कंगनाला हा सीन पसंत नाही आला आणि तिने त्यावेळी दिग्दर्शक असलेल्या कृशला हा सीन हटवण्यासाठी सांगितले. पण दिग्दर्शकांना हे नको होते. येथूनच मतभेदांना सुरुवात झाली.

जेव्हा सोनू सूदला याबद्दल माहिती झाले तेव्हा त्याने चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. कंगना रनौतने त्यावेळी म्हंटले होते कि, जेव्हा मी दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली तेव्हा माझ्या टीमचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. पण सोनू जवळ वेळ आणि विश्वास दोन्हीही नव्हता. तो कोणत्याही महिला दिग्दर्शकाखाली काम करू इच्छित नव्हता.

ज्यावर सोनू सूदने म्हंटले होते कि दिग्दर्शकाचा जेंडर मुद्दा नाही. मी फराह खानसोबत काम केले आहे. पण चित्रपट सोडण्याचे खरे कारण दिग्दर्शकाची क्षमता आहे. या दोन्हींवर कंफ्यूज होऊ नका. मणिकर्णिकाचा भाग न बनल्यामुळे मला नेहमीच दु:ख वाटत राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने