प्रियांका चोप्रा आणि निक जोनासची जोडी बॉलीवूडपासून ते हॉलीवुड पर्यंत खूपच लोकप्रिय आहे. जेव्हा त्यांचे लग्न झाले होते तेव्हा देखील ते खूपच चर्चेमध्ये होते. निक आणि प्रियांकाचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. अशामध्ये सध्या प्रियांकाचा एक मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रियांकाने काही खुलासे केले आहेत.

प्रियांकाने आपल्या मुलाखतीमध्ये म्हंटले आहे कि निकमुळे ती रात्रभर झोपू शकत नाही. तिने याचे कारण स्पष्ट करताना म्हंटले आहे कि निकला डायबिटीज आहे, ज्यामुळे तो नेहमी अस्वस्थ असतो.

प्रियांकाने म्हंटले कि सुरुवातीला मला यातले काही माहिती नव्हते. तथापि निक आपल्या आजाराविषयी खूपच संवेदनशील आहे प्रियांकाने म्हंटले कि निकला झोपेमध्ये देखील आपल्या शुगर लेवलची माहिती होते.

प्रियांकाने म्हंटले कि ती सतत रात्री झोपेतून उठून चेक करत असते कि निक ठीक आहे का नाही. तिने सांगितले कि निकचा हा आजार खूपच कमी वयामध्ये समोर आला होता. पण निक कधीही याला घाबरला नाही, यामुळे तो आपल्या आयुष्यामध्ये नेहमी अनुशासित राहतो. प्रियांकाने म्हंटले कि निकच्या या सकारात्मक वृत्तीमुळे तिला बरीच शक्ती मिळते.

नुकतेच फोर्ब्सच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या कलाकारांची लिस्ट जारी केली गेली आहे, ज्यामध्ये प्रियांकाचा पती निकचा २० वा नंबर लागतो. तो बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या पुढे आहे. अक्षय कुमार फोर्ब्सच्या लिस्टमध्ये ५२ व्या स्थानावर आहे आणि त्याची कमाई ३६४ करोड रुपये आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने