भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑल-राउंडर हार्दिक पांड्या बाप बनला आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा स्टेनकोविकला मुलगा झाला आहे. हार्दिक पांड्याने ट्विटरवर फोटो शेयर करून चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे. तथापि हार्दिकने जो फोटो शेयर केला आहे, त्यामध्ये मुलाचा चेहरा दिसत नाही आहे.

३१ में २०२० रोजी अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंट्सवरून याची माहिती दिली होती कि ते पॅरेंट्स बनणार आहेत. हार्दिक आणि नताशाने या वर्षाच्या सुरुवातीला एंगेजमेंटची घोषणा केली होती. कोरोनामुळे देशामध्ये झालेल्या लॉकडाउन दरम्यान त्यांनी लग्न केले.

नताशा सर्बियाई मॉडल आहे. नुकतेच एका मुलाखतीदरम्यान हार्दिक पांड्याने नताशासोबतच्या आपल्या भेटीबद्दल सांगितले होते. हार्दिकने यादरम्यान सांगितले कि त्याच्या एंगेजमेंटबद्दल आपल्या आई-वडिलांना देखील सांगितले नव्हते. त्याने सांगितले कि भाऊ कृणाल पांड्याला देखील याबद्दल माहीच माहिती नव्हते.

हार्दिकने त्या मुलाखतीमध्ये म्हंटले होते कि, माझ्या आई-वडिलांना देखील माहिती नव्हते कि मी एंगेजमेंट करत आहेत. दोन दिवसांपूर्वी (एंगेजमेंटच्या) च कृणाल पांड्याला सांगितले होते. मी त्याला म्हंटले होते कि माझे आता झाले आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये कोणीतरी मिळाले आहे, ज्याच्यावर मी प्रेम करतो आणि पहिल्यापेक्षा चांगला व्यक्ती बनत आहे. कुटुंबाने माझी साथ दिली आणि म्हंटले जे करायचे आहे ते कर.

नताशाच्या पहिल्या भेटीबद्दल पांड्या म्हणाला कि, तिला काहीच अंदाज नव्हता कि मी कोण आहे. आम्ही बातचीत करून जवळ आलो. जिथे आम्ही भेटलो होतो तिथे मला तिने हॅटमध्ये पाहिले होते. रात्री एक वाजता हॅट घालून चैन घालून, तहामध्ये घड्याळ घालून मी बसलो होतो, तेव्हा तिला वाटले कि कोणती वेगळ्या प्रकारचा व्यक्ती आला आहे. तेव्हा आमच्या दोघांची बातचीत सुरु झाली होती. नंतर आम्ही दोघे एकमेकांना ओळखू लागलो आणि नंतर आम्ही डेट करायला सुरु केले आणि नंतर ३१ डिसेंबरला एंगेजमेंट केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने