दातांचे सौंदर्य तुमच्या आरोग्याचा रिपोर्ट कार्ड असतो. ज्या व्यक्तीच्या दातांमध्ये गडबड आहे त्याला आरोग्यासंबंधी अनेक विकार होण्याची शक्यता असते. पिवळे दात फक्त सौंदर्य वाढवण्याचेच काम करत नाहीत तर याचा प्रभाव तुमच्या आत्मविश्वासावर देखील पडतो. अनेक वेळा जर पिवळे किंवा गलिच्छ दात असणारी व्यक्ती मुक्तपणे हसते तेव्हा कोणीना कोणी त्याला जरूर बोलतो, ज्यामुळे त्याला सर्वांसमोर मान खाली घालावी लागते.

बेकिंग सोडा

आपले पिवळे दात मोत्यांसारखे चमकदार बनवण्यासाठी तुम्ही हा घरगुती उपाय करू शकता, ८ चमचे बेकिंग सोडा घ्या, याशिवाय ८ चमचे व्हर्जिन कोकोनेट ऑईल घ्या, या दोन्ही वस्तू मार्केटमध्ये सहज मिळतात. या दोन्ही वस्तू चांगल्या एकत्र करा, रात्री जेवण केल्यानंतर झोपण्यापूर्वी या मिश्रणाने दात स्वच्छ घासा. थोड्या वेळानंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या करा, काही दिवसांत तुमचे दात चमकदार बनतील.

मीठ

दातांना स्वच्छ करण्यासाठी मीठाचा वापर बर्यानच काळापासून आपल्या संस्कृतीत केला जात आहे. मिठामध्ये मोठ्या प्रमाणात सोडियम आणि क्लोराइड असते जे दातांचा पिवळसरपणा कमी करण्यासाठी मदत करते, यामुळे दात स्वच्छ करताना ब्रशमध्ये पेस्टसोबत थोडे मीठ देखील लावावे, पण हि गोष्ट लक्षात ठेवावी कि मिठाच्या जास्त वापरामुळे दातांच्या इनेमलला देखील नुकसान पोहोचू शकते.

लिंबू

लिंबू आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे, लिंबू दातांमधील बॅक्टेरिया मारण्यासाठी खूपच प्रभावी आहे, जेवण केल्यानंतर लिंबाने दात स्वच्छ केल्यास खूप फायदा मिळतो. दररोज रात्री जेवण केल्यानंतर एका लिंबाचा रस काढून त्यामध्ये थोडेसे पाणी घालावे, हे पाणी पोट आणि दातांसाठी खूप फायदेशीर आहे. नियमित रूपाने असे केल्यास दातांचा पिवळसरपण आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते.

स्ट्रॉबेरी, मीठ आणि बेकिंग सोडा स्क्रब

दोन-तीन स्ट्रॉबेरी घ्या, त्यामध्ये चिमुटभर मिट घाला, नंतर यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा (इच्छित असल्यास) घाला. याचे चांगले मिश्रण करा आणि याला पेस्ट सारखे ब्रशवर लावून दात घासा. कमीत कमीत पाच मिनिटांपर्यंत दात चांगले घासा. नंतर पाण्याने धुवा, गुळण्या केल्यानंतर तुम्हाला देखील फरक जाणवेल कि आपले दात पहिल्यापेक्षा चमकदार झाले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने