सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांचा तपास सुरु आहे. जवळ जवळ ४० लोकांची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी चित्रपट निर्माता रुमी जाफरीला चौकशीसाठी बांद्रा पोलीस स्टेशन येथे बोलावण्यात आले. रुमी जाफरी दुपारी जवळ जवळ ३ वाजता पोलीस स्टेशन पोहोचले आणि १० वाजता बाहेर पडले.

७ तास चाललेल्या या चौकशीमध्ये रुमीने पोलिसांना कोणती माहिती दिली हे अजून समोर आले नाही. रुमीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते कि सुशांतने मृत्यूच्या दोन दिवस आधी १२ जूनला त्याच्यासोबत फोनवर बातचीत केली होती. अभिनेत्याने त्यांना डि प्रे श नबद्दल सांगितले होते आणि म्हंटले होते कि त्याला इंडस्ट्री सोडायची आहे.

सुशांतच्या जवळच्या मित्रांमध्ये सामील आहे रुमी

रुमी सुशांतच्या जवळच्या मित्रांमध्ये सामील होते. अभिनेत्याच्या निधनानंतर त्यांनी खुलासा केला होता कि ते सुशांत आणि रिया चक्रवर्तीसोबत एक चित्रपट प्लान करत होते. रुमीने हे देखील सांगितले कि मृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी सुशांतसोबत स्क्रिप्टबद्दल चर्चा केली होती. दोघांमध्ये खूपच चांगली बॉन्डिंग होती.

असे म्हंटले जाते कि रुमी सुशांत आणि त्याची गर्लफ्रेंड रिया सोबत आपल्या चित्रपटावर एप्रिलमध्ये काम सुरु करणार होते. तथापि लॉकडाउनमुळे असे होऊ शकले नाही. यानंतर त्यांनी प्लान केला होता कि देशातील परिस्थिती सुधारताच ते आपल्या चित्रपटावर काम सुरु करतील.

सुशांतजवळ काम नसल्याच्या दाव्यावर भडकले होते रुमी

१४ जूनला सुशांतने मुंबई स्थित आपल्या फ्लॅटमध्ये ग ळ फा सघेऊन आ त्म ह त्याकेली होती. यानंतर अनेक प्रकारचे अंदाज लावले गेले. हेदेखील म्हंटले गेले कि सुशांतजवळ काम नव्हते, ज्यामुळे तो डि प्रे श नमध्ये होता. या बातम्यांवर रुमी भडकले होते.

त्यांनी एका बातचीत दरम्यान भावूक होऊन म्हंटले होते कि मी फक्त यासाठी मिडियासमोर येत नव्हतो कारण त्याच्यासारख्या सुपरस्टारसोबत अशी वर्तवणूक केली जात होती कि जसे त्याच्याजवळ काहीच काम नव्हते आणि तो आर्थिक परिस्थितीशी सामना करत होता. हे सर्व वाचून मला खूप दु:ख झाले. तो खूपच टॅलेंटेड होता. लोक त्याच्यासोबत न्याय करत नव्हते. कृपया त्याचा आणि त्याच्या वारशाचा सन्मान करा. तो स्टार होता आणि राहील, जेव्हापर्यंत हि इंडस्ट्री आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने