बॉलीवूड अभिनेत्री नेहमी आपल्या सौंदर्याबद्दल चर्चेमध्ये राहत असतात. पण आता पंजाबच्या अभिनेत्रीदेखील सोशल मिडियावर चांगल्याच धुमाकूळ घालताना दिसत आहेत. पंजाबी चित्रपटांमधील अभिनेत्री सौंदर्य आणि अभिनयाच्या बाबतीत बॉलीवूड अभिनेत्रींपेक्षा काही कमी नाहीत. आज या अभिनेत्रींना त्यांच्या सौंदर्यासोबत त्यांच्या अभिनयासाठी देखील ओळखले जाते. चला तर पाहूया आजच्या या पोस्टमध्ये काय खास आहे.

नीरू बाजवा

नीरु बाजवा पंजाबमधील सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या करियरची सुरुवात सोलह बरस की या चित्रपटामधून सुरु केली होती. या चित्रपटामध्ये ती अभिनेता देव आनंदसोबत पाहायला मिळाली होती. यानंतर तिने २००४ मध्ये असा नु मान वतना दा चित्रपटामधून पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला. तिने अनेक टीव्ही सिरियल्समध्ये देखील काम केले आहे. आज नीरु पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री आहे.

मैंडी टखर

मैंडी टखर पंजाबची लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयासाठी नेहमीच चर्चेमध्ये राहत असते. मैंडीने २०१० मध्ये एकम: सन ऑफ़ सॉइल या चित्रपटामधून पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली, इतकेच नाही तर तिने तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

सारा गुरपाल

सारा गुरपालची गणना पंजाबच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते. तिने खूपच कमी काळामध्ये पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती नेहमी पंजाबी म्युझिक व्हिडिओंमध्ये पाहायला मिळत असते.

हिमांशी खुराना

हिमांशी खुराना पंजाबमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती बिग बॉस १४ मध्ये देखील आली होती, यानंतर ती खूपच लोकप्रिय झाली. तिने आपल्या करियरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. यानंतर ती म्युझिक व्हिडिओ आणि पंजाबी चित्रपट सद्दा हक मध्ये पाहायला मिळाली होती.

मोनिका गिल

मोनिका पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधील चर्चित अभिनेत्री आहे. तीने मिस इंडिया यूएसए २०१३ किताब देखील आपल्या नावावर केला आहे. तिने अम्बरसरिया मधून पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटामध्ये ती दिलजीत दोसांझ सोबत पाहायला मिळाली होती. यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ती बॉलीवूड चित्रपट फिरंगी आणि पलटनमध्ये देखील दिसली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने