बॉलीवूड फिल्मी जगतामध्ये अनेक अभिनेत्रींना काही हॉट आइटम नंबर करताना पाहिले असेल पण या गाण्यांना अधिक मधुर बनवणारा आवाज ज्यांचा आहे त्या देखील एखाद्या अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलीवूड सिंगर्सबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या आवाजाप्रमाणेच त्यादेखील खूपच सुंदर आहेत. चला तर जाणून घेऊया त्या सुंदर सिंगर्स बद्दल.

नेहा भसीन

नेहा भसीन एक प्रसिद्ध पंजाबी फिल्म इंडस्ट्रीमधील सिंगर आहे जी बॉलीवूडमध्ये देखील आपले करियर बनवण्यात सफल झाली. नेहा भसीन बॉलीवूडमधील एक पॉप सिंगर आहे. नेहा भसीन आज ते नाव आहे ज्याला सर्वजण ओळखतात किंवा ओळखण्याची इच्छा आहे. नेहा भसीन दिसायला एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा काही कमी नाही. नेहाने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमधील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. नेहाने फॅशन, गुंडे, मेरे ब्रदर की दुल्हन सारख्या चित्रपटांतील गाण्यांमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवली आहे. काही लोकं नेहाला भारतातील पहिली ऑल-गर्ल्स विवा मुळे देखील ओळखतात.

अनुष्का मनचंदा

अभिनेत्री आणि बॉलीवूड सिंगर अनुष्का मनचंदा आपल्या बोल्ड अवतारामुळे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आली आहे. आपल्या परफेक्ट टोंड बॉडी आणि फॅशन स्टेटमेंटमुळे सिंगर अनुष्का मनचंदा एखाद्या बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा काही सुंदर कमी नाही. अनुष्का बॉलीवूडमध्ये बऱ्याच काळापासून अॅक्टिव्ह आहे. तिने डांस बसंती (उंगली), गोलमाल (गोलमाल), तू साला (गोलमाल रिटर्न्स), लाइफ इज अ गेम (तीन पत्ती), मिट जाए गम (दम मारो दम), अल्ला दुहाई है (रेस), बेजुबां फिर से (ABCD २), मनमा इमोशन जागे (दिलवाले) सारख्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

नीति मोहन

मोहनने आपल्या करियरचा डेब्यू करण जौहरच्या स्टूडेंट ऑफ़ द ईयर मधील इश्क वाला लव या गण्यामधून केला होता. हे गाणे त्यावेळी हिट झाले होते आणि तरुणवर्गामध्ये याची चांगली क्रेज झाली होती. मोहनचे हे गाणे तिच्या आतापर्यंतच्या करियरमधील सर्वात हिट गाणे आहे. तिच्या दोन बहिणी शक्ती मोहन आणि मुक्ति मोहन सारखेच सिंगर नीति मोहन देखील इंडस्ट्रीमध्ये काम करते. खूपच सुंदर असलेली नीति आपल्या स्टाईल आणि फॅशन सेंसमुळे देखील ओळखली जाते.

नेहा कक्कर

बॉलीवूडमध्ये आपली खास ओळख निर्माण करणारी सिंगर नेहा कक्करला आज कोणाच्या ओळखीची गरज नाही. आपल्या गाण्यांसाठी ओळखली जाणारी सिंगर नेहा कक्करने हाई कमर जींस किंवा पँट सोबत क्रॉप टॉपची फॅशन व्हायरल केली आहे. ती आपल्या गाण्यामधून दर्शकांना मंत्रमुग्ध करते आणि रियल लाईफमध्ये ती खूपच हॉट आहे.

श्वेता पंडित

श्वेताने एआर रहमान सहित बॉलीवूडच्या मोठमोठ्या संगीतकारांच्यासाठी बॉलीवूड गाण्यांसाठी आवाज दिला आहे. श्वेता भारतीय शास्त्रीय गायक आणि पद्मविभूषण पंडित जसराज यांची भाची आहे. तिने विविध क्षेत्रीय आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी रेकॉर्ड केली आहे आणि ती दिसायला देखील खूपच सुंदर आहे.

मोनाली ठाकुर

मोनाली इंडियन आयडॉल २ मध्ये टॉप स्पर्धकांमध्ये स्थान मिळविण्यात सफल राहिली होती. मोनालीच्या शोमधून एलिमिनेट झाल्यानंतर जज अनु कपूरने तिला जाने-ए-मन चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली. यानंतर मोनालीने संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्तीच्या दिग्दर्शनाखाली रेस चित्रपटाची दोन गाणी गायली. ख्वाब देखे आणि जरा-जरा टच मी. दोन्हीहि गाणी सुपरहिट राहिली होती. मोनाली ठाकूर जितकी उत्कृष्ठ गाते तितकीच ती दिसायला देखील खूपच सुंदर आहे. शिवाय सिंगिंगसोबत ती अभिनय देखील करते.

शाल्मली खोलगड़े

शाल्मली खोलगड़ेने आपल्या सिंगिंग करियरची सुरुवात इश्कजादे चित्रपटामधील परेशान गाण्यापासून सुरु केली होती. हे गाणे त्यावर्षी खूपच सुपरहिट झाले होते. तिला या गाण्यासाठी अॅवॉर्ड देखील मिळाला होता. तरुण आणि सुंदर भारतीय बॉलीवूड सिंगर शाल्मली खोलगड़ेने अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत आणि आपल्या अनोख्या रेसिंग सेंसमुळे देखील ती ओळखली जाते.

अदिति सिंह शर्मा

अदिति सिंह शर्माने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमधील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. तिला बॉलीवूडमधील पहिला ब्रेक अनुराग कश्यपचा चित्रपट देवडी मधून मिळाला होता. या सुंदर सिंगरने बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमधील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. अदिति दिसायला देखील खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने